ट्रायल कोर्टाला कनिष्ठ न्यायालय म्हणणे थांबवा : सर्वोच्च न्यायालयाची रजिस्ट्रीला सूचना
पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्रायल कोर्टांचा कनिष्ठ न्यायालय, असा उल्लेख करणे थांबवले तर ते योग्य होईल. ट्रायल कोर्टाच्या रेकॉर्डला कनिष्ठ कोर्टाचे रेकॉर्ड म्हणू नये, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने आपल्या रजिस्ट्रीला (नोंदणी विभाग) नुकतीच केली आहे. ( Stop referring to the Trial Courts as 'Lower Courts' : Supreme Court )
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या जन्मठेपेच्या शिक्षेच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या दोघांच्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय एस ओक आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने स्पष्ट केले की, "सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने ट्रायल कोर्टाला कनिष्ठ न्यायालय म्हणणे चुकीचे आहे. असा उल्लेख करणे थांबवले तर ते योग्य होईल. ट्रायल कोर्टाच्या रेकॉर्डला कनिष्ठ कोर्टाचे रेकॉर्ड म्हणू नये. या आदेशाची निबंधकांनी दखल घ्यावी."
हेही वाचा :
- Article 370 verdict : कलम ३७० रद्दचा निर्णय कायम, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
- Article 370 verdict : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुका सप्टेंबर २०२४ पर्यंत घ्या : सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
- Adani-Hindenberg : अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाची चौकशी 'सेबी'च करणार : सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टाेक्ती

