Anand Mahindra Christmas Post : छोट्या सांताक्लॉजची टीम सायकलसवारी करत गिफ्ट देण्यासाठी रवाना; आनंद महिंद्रा यांची पोस्ट व्हायरल | पुढारी

Anand Mahindra Christmas Post : छोट्या सांताक्लॉजची टीम सायकलसवारी करत गिफ्ट देण्यासाठी रवाना; आनंद महिंद्रा यांची पोस्ट व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : लहान मुलांना ख्रिसमस दिवशीचा सांता पाहण्याची खूप इच्छा असते. काहींचं तर सांता होण्याचं स्वप्न असते. असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनाही याची बुरळ पडली असून त्यांनी आज (दि. २५) हा फोटो आपल्या एक्स अकौंटवरून शेअर केला आहे. हा फोटो पाहून यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील एका युजरने छोट्या सांताक्लॉजची टीम सायकलसवारी करत गिफ्ट देण्यासाठी रवाना अशी कमेंट केली आहे.

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असतात. ख्रिसमस दिवशी त्यांनी एक्सवर छोट्या सांताक्लाजची टीम सायकलची सवारी करत असल्याचा फोटो शेअर केला आहे. याला अनुसरुन महिंद्रा यांनी आनंदी जीवनाविषयी विचार व्यक्त केले आहेत. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी ख्रिसमसच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

महिंद्रा यांच्या पोस्टमधील फोटोला कॅप्शन देत म्हटले आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात प्रत्येक दिवस हा वेगवेगळे अनुभव घेऊन येत असतो. हा फोटो कोणी काढला माहिती नाही पण हा फोटो पाहिल्यानंतर चेहऱ्यावर प्रसन्नता आणि आनंद जाणवू लागला आहे.

काय आहे फोटोमध्ये?

महिंद्रा यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये एक सरदार सायकल चालवत आहे. या सायकलवर जवळपास डझनभर लहान सांता आहेत. यातील एक सांता तर सायकलस्वार सरदारसमोर हँडल धरून बसलेला आहे. हँडल धरुन बसलेल्या छोट्या सांताला तर आपण स्वत: या सर्वांना सायकल सवारी देत असल्याचा अनुभव येत आहे. यामध्ये सायकलस्वार सरदाराच्या पाठीमागे बसलेले सहा ते सात जण या सवारीचा मौजमजा करत आनंद लुटत आहेत.

हेही वाचा

Back to top button