पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या ३० तासांपासून नॉट रिचेबल असलेले मुख्यमंत्री हेमंत सोरेन आज (दि.३०) रांची येथील त्यांच्या निवास्थानी दाखल झाले आहेत. दरम्यान सोरेन यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अटक केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे झारखंडमध्ये राजकीय हालचाली क़मालीचा वेग आला आहे. सोरेन यांनी रांची येथील निवास्थानी पोहचले. त्यांनी सरकारमधील आमदारांची तातडीने बैठक बोलावली. या बैठकीला सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेनयाही उपस्थित होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा 'प्लॅन-B' तयार असून, त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन या झारखंडच्या नव्या मुख्यमंत्री होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. (Hemant Soren's 'Plan-B')
कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन चौकशी सुरू आहे. साेमवारी झालेल्या चौकशीनंतर साेरेन यांचा कोणचाही संपर्क होत नव्हता. ३० तासांहून अधिक तास ते नॉच रिचेबल होते. अखेर मंगळवारी दुपारी ते रांची येथील निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी तत्काळ राज्याचे मंत्री आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन याही बैठकीला उपस्थित होत्या, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. (Hemant Soren's 'Plan-B')
झारखंडमध्ये "कल्पना सोरेन या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील याविषयी फारशी शंका नाही. त्यांना कोणीही खरे आव्हान देणारे नाही आणि पक्षातील सर्वजण त्यांना स्वीकारतील," असे रांचीस्थित एका ज्येष्ठ पत्रकाराने IndiaToday.In ला दिलेल्या माहितीत सांगितले आहे, असे देखील 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तात स्पष्ट केले आहे. (Hemant Soren's 'Plan-B')
राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर सोरेन यांचे शासकीय निवासस्थान, राजभवन आणि रांची येथील ईडी कार्यालयाच्या १०० मीटरच्या क्षेत्रात फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत जेएमएमचे आमदार सोरेन यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी थांबले होते. कथित जमीन फसवणुकीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात ईडीच्या पथकाने त्यांची चौकशी करण्यासाठी तेथे भेट दिली होती.