पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमधील सारण लोकसभा मतदारसंघात पाचव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर हिंसाचार घडला आहे. सोमवारी छपरा येथील बूधवर भाजप आणि राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. आज सकाळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर गोळीबार केला, त्यात तीन जणांना गोळ्या लागल्या. या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची मुलगी, राष्ट्रीय जनात दलाच्या रोहिणी आचार्य सारण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सोमवारी रोहिणी आचार्य या मतदान झाल्यानंतर छपरा शहरातील एका बूधवर गेल्या होत्या. त्यावेळी तेथे भाजप आणि राजदच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. बूथ क्रमांक ३१८ आणि ३१९ वर हा वाद झाला होता. त्यानंतर आज सकाळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर गोळीबार केला. यात एकाचा मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी पाटणा येथे दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर छपराच्या भिखारी ठाकूर चौकाजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सारणमध्ये दोन दिवसांसाठी इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचा :