

ओमायक्रॉन Omycron व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबई विमानतळ नियमावलीवर केंद्र सरकारने आक्षेप घेतला असून देशभरातील निमावलीचे पालन करण्याबाबत सूचित केले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाला पत्र पाठविले लिहिले असून त्यात आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांबाबत काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. विमान प्रवाशांबाबत राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांवर आक्षेप घेतला आहे.
ओमायक्रॉन व्हेरिएंटचा भारतात एकही रुग्ण आढळलेला नाही, तरीही परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. कालपासून सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर तपासणी बंधनकारक केली आहे. युरोपमधून मंगळवारी दिल्लीत आलेल्या चार प्रवाशांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आल्यानंतर पहिल्याच दिवशी चार प्रवासी करोनाबाधित आढळले. मात्र, महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या सूचनांची वाट न पाहता आधीपासूनच तपासणी सुरू केली असून प्रवाशांना क्वारंटाइन करण्याचे धोरण अवलंबले होते.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र आरोग्य विभागाला एक पत्र लिहिले असून त्यात त्यांनी नियमावलीला आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना तातडीने पत्र लिहिले असून आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नियमावलीवर आक्षेप घेतला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबंकल्याण मंत्रालयाने जी नियमावली ठरविली आहे, तीच अंमलात आणावी असे निर्देश दिले आहेत. भूषण यांनी मुंबई विमानतळाचा उल्लेख करून विशेष सूचना केल्या आहेत.
परदेशातून मुंबई विमानतळावर दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची RT-PCR चाचणी सक्तीची करण्यात यावी. तो कोणत्याही देशातून आला असला तरी चाचणी बंधनकारक असेल. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना १४ दिवस सक्तीने होम क्वारंटाइन करावे. RT-PCR चाचणी निगेटिव्ह असली तरीही क्वारंटाइन राहावे लागणार आहे. मुंबईहून पुढे जाणाऱ्या सर्व प्रवाशांना RT-PCR चाचणी अहवाल निगेटिव्ह आला तरच विमानतळ सोडू दिले जाणार आहे. परराज्यातून येणाऱ्या प्रत्येकाकडे किमान ४८ तास आधीचा आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असावा.
हेही वाचा :