Lok Sabha Election 1st Phase : पहिल्‍या टप्‍प्‍यातील प्रचार आज थंडावणार, जाणून घ्‍या ‘प्रमुख’ लढती | पुढारी

Lok Sabha Election 1st Phase : पहिल्‍या टप्‍प्‍यातील प्रचार आज थंडावणार, जाणून घ्‍या 'प्रमुख' लढती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीतील पहिल्‍या टप्‍प्‍यातील प्रचार आज ( दि. १७ एप्रिल) सायंकाळी थंडावणार आहेत. १९ एप्रिल रोजी २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांसाठी मतदान होणार आहे. आठ केंद्रीय मंत्री दोन माजी मुख्यमंत्री आणि माजी राज्यपाल हे १९ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मैदानात आहेत. ( Lok Sabha Election 1st Phase )

गडकरींच्‍या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील नागपूर मतदारसंघातही मतदान होणार आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी नागपूरमधून विजयाची हॅट्ट्रिक करणार का, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. २०१४ मध्ये त्यांनी सातवेळा खासदार विलास मुत्तेमवार यांचा 2.84 लाख मतांच्या फरकाने पराभव केला होता. 2019 मध्ये त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांचा 2.16 लाख मतांनी पराभव केला होता.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अरुणाचल पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्‍यांनी २००४ पासून तीन वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. रिजिजू यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान अरुणाचल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नबाम तुकी आहेत.

आसामचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल हे आसाममधील दिब्रुगडमधून लोकसभेत परतण्याची अपेक्षा करत आहेत. दिब्रुगडमधून केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांना उमेदवारी नाकारात सोनोवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये तिरंगी निवडणूक लढत असून, केंद्रीय मंत्री संजीव बल्यान हे समाजवादी पक्षाचे हरिंद्र मलिक आणि बसपाचे उमेदवार दारा सिंह प्रजापती यांच्यात लढत आहेत. दोन वेळा खासदार राहिलेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंत्रिमंडळातील सहकारी जितेंद्र सिंह हे उधमपूरमध्ये हॅट्ट्रिक करण्यासाठी प्रयत्नात आहेत.

विद्यमान खासदार बालकनाथ यांच्या जागी राजस्थानमधील अलवरमधून तिकीट देण्यात आलेले केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य भूपेंद्र यादव हे काँग्रेस आमदार ललित यादव यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे राजस्थानच्या बिकानेर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी मंत्री गोविंद राम मेघवाल यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.
तामिळनाडूतील निलगिरी लोकसभा मतदारसंघात द्रमुकचे विद्यमान खासदार आणि माजी दूरसंचार मंत्री ए राजा आणि भाजपचे केंद्रीय मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री एल मुरुगन यांच्यात चुरशीची लढत होत आहे. मध्य प्रदेशातून राज्यसभेवर निवडून आलेले मुरुगन येथून पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत.

कार्ती चिदंबरम पुन्हा रिंगणात

शिवगंगाईचे खासदार कार्ती चिदंबरम पुन्हा एकदा त्या जागेवरून रिंगणात आहेत. त्‍यांचे वडील पी चिदंबरम यांनी भाजपचे टी देवनाथन यादव आणि अण्‍णाद्रमुकचे झेवियर दास यांच्या विरोधात सातवेळा विजय मिळवला आहे. तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अन्नामलाई तामिळनाडूतील कोईम्बतूर येथून निवडणूक लढवत आहेत, त्यांचा द्रमुकचे नेते गणपथी पी राजकुमार आणि अण्‍णाद्रमुकचे सिंगाई रामचंद्रन यांच्या विरोधात लढत आहे.

कनिमोझी यांच्या विरोधात माजी राज्‍यपाल सुंदरराजन

तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर या पदाचा राजीनामा देऊन अलीकडेच सक्रिय राजकारणात पुनरागमन करणाऱ्या तमिलिसाई सुंदरराजन या चेन्नई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसच्या दिग्गज नेत्या कुमारी अनंता यांची मुलगी सुंदरराजन यांनी २०१९ लोकसभा निवडणूक द्रमुकच्‍या नेत्‍या कनिमोझी यांच्या विरोधात लढवली होती. त्‍यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. यावेळी कनिमोळी या जागेवरून पुन्हा निवडणूक लढवत आहेत. येथे राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीचा (रालोआ) मित्रपक्ष तमिळ मानिला काँग्रेस (मूपनार) ने SDR विजयसीलन आणि अण्‍णाद्रमुकने आर शिवासामी वेलुमणी यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसचा अभेद्य गड ‘छिंदवाडा’मधून कमलनाथ पुत्र पुन्‍हा रिंगणात

काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ छिंदवाडामधून पुन्हा निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात १९८० पासून सलग ९ वेळा कमलनाथ यांनी निवडणूक जिंकली आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने मध्‍य प्रदेशमधील लोकसभेच्‍या २९ पैकी २८ जागा जिंकल्या; परंतु छिंदवाडा येथे कमलनाथ यांचा पराभव करण्‍यात भाजपला अपयश आले होते. जिथे नकुल नाथ यांनी भाजप उमेदवाराचा तब्‍बाल ३७,५३६ मतांनी पराभव केला होता. मध्‍य प्रदेशमध्‍ये काँग्रेसला एकमेव जागेवर विजय मिळाला होता.

पश्‍चिम त्रिपुरात हाय-व्होल्टेज टक्कर

त्रिपुरातील लोकसभेच्या दोन जागांपैकी पश्चिम त्रिपुरा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तेथे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आशिष कुमार साहा यांच्यात हाय-व्होल्टेज टक्कर होणार आहे.
लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते आणि माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा मुलगा गौरव गोगोई यांनी आसामच्या कालियाबोर मतदारसंघातून २०१४ पासून दोनदा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. तरुण गोगोई शेजारच्या जोरहाटमधून पक्षाचे उमेदवार आहेत. 2019 मध्ये भाजपचे टोपन कुमार गोगोई यांनी ही जागा जिंकली होती. गौरव गोगई यांच्या 2019 च्या कालियाबोर जागेच्या सीमांकनामुळे, यावेळी ते जोरहाटमधून निवडणूक लढवत आहेत.

मणिपूरमध्‍ये भाजप-काँग्रेस आमने-सामने

मणिपूरचे कायदा आणि शिक्षण मंत्री बसंत कुमार सिंग हे इनर मणिपूर जागेवरून भाजपचे उमेदवार आहेत. ते जेएनयूचे प्राध्यापक आणि काँग्रेसचे उमेदवार बिमल अकोइझम यांच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत. सिंह थौनाओजम चाओबा सिंग यांचे पुत्र आहेत. ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारमध्ये क्रीडा, युवा व्यवहार, संस्कृती आणि अन्न प्रक्रिया राज्यमंत्री होते.

चुरूची लढत ठरली लक्षवेधी

उत्तर राजस्थानमधील भाजपचा बालेकिल्ला असलेल्या चुरूमध्ये भाजपचे उमेदवार देवेंद्र झाझरिया आणि काँग्रेसचे राहुल कासवान यांच्यात रंजक लढत पाहायला मिळत आहे. कासवानच्या पक्षांतरामुळे चुरूची लढत लक्षवेधी ठरली आहे. दोन वेळा भाजप सोडलेल्या सिंह यांनी पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर मार्चमध्ये पुन्हा पक्ष सोडला. लोकसभेच्‍या ५४३ जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार असून, ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button