बप्पी लाहिरी पाणीपुरी : सोन्या-चांदीने सजली, ड्रायफ्रूट्सने मढली, थंडाईने भरली | पुढारी

बप्पी लाहिरी पाणीपुरी : सोन्या-चांदीने सजली, ड्रायफ्रूट्सने मढली, थंडाईने भरली

पुढारी ऑहलाईन : पाणीपुरी, फुलकी, पुचका किंवा गोलगप्पे म्‍हणा नाव काहीही असो मात्र तीची चव प्रत्‍येकालाच आवडते. तसे पाहायला गेल तर चिंचेच पाणी किंवा कैरीच्या आंबट-गोड पाण्यासोबत पाणीपुरी खाल्‍ली जाते. पुरीच्या आत बटाट्याची चटपटी, हरभरा त्‍याच्यावर बारीक चिरलेला कांदा, बुंदी, शेव घातल्‍याने तीच्या चवीला चारचाँद लागतात. अशा पाणीपुरीची प्लेट सजली की खायच्या आधीच तोंडात पाणी सुटायला लागते. मात्र गुजरातच्या एका स्‍ट्रीट फूड विक्रेत्‍याने पाणीपुरीचे एक नवे व्हर्जन समोर आणले आहे.

ही पाणीपुरी नेहमीच्या पाणीपुरीपेक्षा थोडी वेगळी आहे. ज्‍यामध्ये आंबट, गोड पाणी नसून ड्रायफ्रुट्स आणि थंडाईचाही समावेश आहे. ज्‍याला सोन्याच्या प्लेटमध्ये सोन्या-चांदीच्या मुलाम्‍यात सजवले जाते. नुकताच एका फूड ब्‍लॉगरने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या पाणीपुरीवरून लोकांमधून समीश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक ही युनिक आयडिया असल्‍याचे म्‍हणत आहेत, तर काही लोकांना पाणीपुरीसोबत चेष्‍टा केल्‍यासारखे वाटत आहे. काही लोकांनी लिहिलंय की, पाणीपुरीला पाणीपुरीच राहू द्या. महलांची राणी हो दे नका. दुसऱ्या एकाने याला म्‍हटलंय बप्पी लहिरी पाणीपुरी. तिसऱ्या एकाने लिहिलंय की, मी फ्रीमध्ये देखील ही पाणीपुरी खाणार नाही. रेसिपीच बदलून टाकली.

हेही वाचा :  

Back to top button