Rahul Gandhi Vs PM Modi | ‘केवळ एकच नेता’ ही कल्पनाच भारतीय तरुणांचा अपमान : राहुल गांधी | पुढारी

Rahul Gandhi Vs PM Modi | 'केवळ एकच नेता' ही कल्पनाच भारतीय तरुणांचा अपमान : राहुल गांधी

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे नेते आणि लोकसभा वायनाड मतदारसंघाचे उमेदवार राहुल गांधी हे सध्या केरळमध्ये आहेत. दरम्यान, प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी ‘केवळ एकच नेता’ ही कल्पनाच भारतीय तरुणांचा अपमान असल्याचे म्हणत, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. (Rahul Gandhi Vs PM Modi)

राहुल गांधी यांनी केरळ येथील प्रचारादरम्यान बोलताना सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधानांवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले, आज मुख्य लढा आरएसएसच्या विचारसरणीविरुद्ध आहे. भाजपचे लोक, पंतप्रधान ‘एक राष्ट्र, एक लोक, एक भाषा, एक नेता’ असा उल्लेख करतात. परंतु भाषा ही वरून लादलेली गोष्ट नाही. भाषा ही अशी गोष्ट आहे जी व्यक्तीच्या आतून, व्यक्तीच्या हृदयातून बाहेर पडते. (Rahul Gandhi Vs PM Modi)

तुमची भाषा हिंदीपेक्षा निकृष्ट आहे, असे केरळमधील व्यक्तीला सांगणे म्हणजे केरळच्या लोकांचा अपमान आहे, असेदेखील ते म्हणाले.
भारतात फक्त एक नेता असावा ही कल्पनाच प्रत्येक तरुण भारतीयाचा अपमान आहे, असेदेखील काँग्रेस नेते, वायनाड मतदारसंघाचे उमेदवार राहुल गांधी यांनी प्रचारादरम्यान म्हटले. (Rahul Gandhi Vs PM Modi)

हे ही वाचा:

Back to top button