मुलांपासून प्रेरणा! २०० कोटींची संपत्ती दान करुन गुजरातचे उद्योगपती घेणार दीक्षा | पुढारी

मुलांपासून प्रेरणा! २०० कोटींची संपत्ती दान करुन गुजरातचे उद्योगपती घेणार दीक्षा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गुजरातमधील उद्योगपती भावेश भाई भंडारी आणि त्यांच्या पत्नीने २०० कोटी रुपयांची संपत्ती दान करुन सांसारिक आसक्ती सोडून दीक्षा घेण्‍याचा निर्णय घेतला आहे. बडे व्यावसायिक अशी ओळख असणार्‍या भावेश भाई यांच्‍या या निर्णयाची गुजरातमध्‍ये चर्चा आहे. विशेष म्‍हणजे भावेश यांचा १६ वर्षांचा मुलगा आणि १९ वर्षांच्या मुलीने दोन वर्षांपूर्वीच दीक्षा घेतली आहे. मुलांपासून प्रेरणा घेऊन त्‍यांनी दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

भावेश भाई भंडारी हे मूळचे गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील बांधकाम व्‍यवसायिक आहेत. साबरकांठा ते अहमदाबादपर्यंत त्यांचा व्यवसाय आहे. त्‍यांना ओळखणारे सांगतात की, भंडारी कुटुंबीयांचा नेहमीच जैन धर्माच्‍या शिकवणीकडे कल राहिला आहे. त्यांचे कुटुंबीय अनेकदा दीक्षा आणि शिक्षकांना भेटत असत. काही महिन्‍यांपूर्वी भावेश भाई आणि त्यांच्या पत्नीने ऐशोआरामाचे जीवन सोडून जैन धर्माची दीक्षा घेण्याचा आणि तपस्वी जीवन जगण्याचा निर्णय घेतला होता.

200 कोटी रुपयांची मालमत्ता केली दान

भावेश भाई भंडारी आणि त्यांच्या पत्नीची साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगरमध्ये मोठ्या थाटामाटात चार किलोमीटर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्‍यांनी २०० कोटी रुपयांची मालमत्ता दान केली. भावेश भाई यांच्‍या ओळखीचे दिकुल गांधी यांनी सांगितले की, २२ एप्रिल रोजी भावेश भाई आणि त्यांच्या पत्नीसह हिम्मतनगर रिव्हर फ्रंट येथे शांत जीवन जगण्याचा संकल्प करणार आहेत. भावेश भाई आणि त्यांच्या पत्नीला दैनंदिन काटेकोर नियम पाळावे लागतील. ते आयुष्यभर भिक्षा मागून जगतील. पंखे, एसी, मोबाईल फोन यांसारख्या सुखसोयींचा त्याग करतील. तसेच अनवाणी चालतील.

मुलगा आणि मुलीने घेतली दोन वर्षांपूर्वीच दीक्षा

भावेश भाई भंडारी आणि त्यांच्या पत्नी यांनी दिक्षा घेण्‍यापूर्वी दोन वर्ष आधी त्‍यांचा १६ वर्षांचा मुलगा आणि १९ वर्षांच्या मुलीने दीक्षा घेतली होती. मुलांपासून प्रेरणा घेऊन भावेश भाई आणि त्यांच्या पत्नीने आता दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून, त्‍यांनी आपली २०० कोटी रुपये संपत्ती केलेल्‍या दान गुजरातमध्‍ये चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा : 

Back to top button