Bengaluru Rameshwaram Cafe blast case | रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड, बॉम्बरला पश्चिम बंगालमधून अटक

Bengaluru Rameshwaram Cafe blast case | रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड, बॉम्बरला पश्चिम बंगालमधून अटक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बंगळूर येथील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी पश्चिम बंगालमधून दोन संशयितांना अटक केली आहे. अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजीब अशी त्या संशयितांची नावे आहेत. बंगळूरच्या ब्रुकफिल्ड येथील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या आयईडी स्फोटात किमान १० जण जखमी झाले होते. (Bengaluru Rameshwaram Cafe blast case)

रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील फरारी संशयित अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजेब यांना कोलकाता जवळील त्यांच्या लपण्याच्या ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले. मुसावीर हुसेन शाजीब याने कॅफेमध्ये आयईडी ठेवला होता आणि अब्दुल मतीन ताहा या बॉम्बस्फोटामागील मास्टरमाईंड होता, असे NIA ने म्हटले आहे.

एनआयएने पुढे सांगितले की, दोघे खोटी ओळख दाखवून लपले होते. एनआयएने पुढे निवेदनात म्हटले आहे की, संशयित आरोपींना केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि पश्चिम बंगाल, तेलंगणा, कर्नाटक आणि केरळमधील पोलिसांच्या समन्वयित कारवाईत पकडण्यात आले.

शाजीब आपली ओळख लपवण्यासाठी 'मोहम्मद जुनेद सय्यद' नावाचा वापर करत होता. तर ताहा हा हिंदू असल्याचे ओळखपत्रे आणि विघ्नेश नावाचे बनावट आधार कार्ड वापरत होता, असे एनआयएने सांगितले.

२९ मार्च रोजी एनआयएने दोन संशयित आरोपींची छायाचित्रे आणि तपशील प्रसिद्ध केले होते. या प्रकरणातील संशयिताची माहिती देण्यासाठी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

गेल्या महिन्यात, NIA ने मुख्य आरोपीला रसद पुरवल्याचा आरोप असलेल्या चिक्कमंगळूर येथील रहिवासी असलेल्या मुझम्मिल शरीफला अटक केली होती.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news