Lok Sabha Election: पंतप्रधान मोदींची पहिली सभा आज विदर्भात
नागपूर, पुढारी वृत्तसेवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील पहिला निवडणूक प्रचार दौरा, जाहीर सभेच्या निमित्ताने सोमवारी (८ एप्रिल) विदर्भात येत आहेत. चंद्रपुरातील महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मोरवा विमानतळ परिसरात ही सभा होत असून जोरदार पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे. (Lok Sabha Election)
लगेच दोन दिवसांत नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघात कन्हान येथे १० एप्रिल रोजी जाहीर सभेसाठी पंतप्रधान मोदी येणार आहेत. सोमवारी पंतप्रधान मोदी विदर्भ दौऱ्यावर येत असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील विदर्भात येत आहेत. हिंगणघाट, भंडारा आणि नागपुरातील फ्रेंडस् कॉलनी येथे त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. (Lok Sabha Election)
Lok Sabha Election: राहुल, प्रियांका गांधीही येणार
काँग्रेसच्या प्रचारासाठी लवकरच राहुल गांधी, प्रियांका गांधी येत आहेत. १४ एप्रिल रोजी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे नागपुरात येत असून पवित्र दीक्षाभूमीला ते भेट देणार असल्याची माहिती आहे. एकंदरीत या आठवड्यात प्रचाराची, रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा:

