Jammu and Kashmir URI sector | भारतीय सैन्यानी उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, एक दहशतवादी ठार | पुढारी

Jammu and Kashmir URI sector | भारतीय सैन्यानी उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, एक दहशतवादी ठार

पुढारी ऑनलाईन : भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी बारामुल्ला जिल्ह्यातील सबुरा नाला उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न आज शुक्रवारी सकाळी हाणून पाडला. या कारवाईत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे. आज पहाटे ही घटना घडली. या ठिकाणी अजूनही अजूनही गोळीबार सुरू आहे. (Jammu and Kashmir URI sector)

उरी सेक्टरमध्ये गोळीबारानंतर सर्च ऑपरेशन सुरु असून आणि परिसराची घेराबंदी करण्यात आली आहे. या कारवाईत एक दहशतवादी मारला गेला आहे, अशी माहिती भारतीय सैन्याच्या सूत्रांनी दिली आहे.

दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय सुरक्षा दलातील जवानांनी केलेल्या गोळीबारामुळे दहशतवाद्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. नियंत्रण रेषेजवळ दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारानंतर अतिरिक्त फौजा घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती सैन्याच्या सूत्रांनी दिली.

सुरक्षा जवानांना बारामुल्ला जिल्ह्यातील उरी भागातील सबुरा नाला रुस्तम येथे नियंत्रण रेषेवर संशयास्पद हालचाली दिसून आल्या. या दरम्यान घुसखोरांनी गोळीबार सुरू केला. ज्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याला ठार केले.

हे ही वाचा :

Back to top button