BJP MP Sushil Kumar Modi | भाजप खासदार सुशील कुमार मोदी यांची भावनिक पोस्ट, मला ६ महिन्यांपासून कॅन्सर….

BJP MP Sushil Kumar Modi | भाजप खासदार सुशील कुमार मोदी यांची भावनिक पोस्ट, मला ६ महिन्यांपासून कॅन्सर….

पुढारी ऑनलाईन : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी बुधवारी सांगितले की ते गेल्या सहा महिन्यांपासून कॅन्सरशी लढा देत असल्याने ते आगामी लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये सहभागी होऊ शकणार नाही. याबाबतची माहिती त्यांनी त्यांच्या X अकाऊंटवर पोस्ट करत शेअर केली आहे.

"गेल्या ६ महिन्यांपासून मी कॅन्सरशी लढा देत आहे. आता लोकांना सांगायची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत मी काहीही करू शकणार नाही. याबाबत सर्व काही पंतप्रधानांना सांगितले आहे. देश, बिहार आणि पक्षाचे नेहमीच आभार आणि सदैव समर्पित राहीन." अशी भावनिक पोस्ट सुशील कुमार मोदी यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुशील कुमार मोदी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आलेले नाहीत. पण ते सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय घडामोडींविषयी प्रतिक्रिया देत असतात. सुशील कुमार मोदी हे बिहारमधील दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. त्यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत याचवर्षी संपली होती. भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर ते निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. आता त्यांनी सार्वजनिकरित्या त्यांना कॅन्सर असल्याचे म्हटले आहे.

सुशील कुमार मोदी यांची राजकीय कारकिर्द

सुशील कुमार मोदी यांनी पहिल्यांदा १९९० मध्ये पाटणा मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि ते सलग तीनवेळा निवडणूक जिंकले होते. १९९६ ते २००४ पर्यंत ते बिहार विधानसभेत भाजपचे विरोधी पक्षनेते होते. सुशील कुमार मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर चारा घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. यात लालू प्रसाद अडकले. २००४ मध्ये ते पहिल्यांदा संसदेत पोहेचले. त्यांनी भागलपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news