रत्नागिरी-सिंधुदुर्गावर शिवसेनेचा दावा कायम : उदय सामंत

उदय सामंत
उदय सामंत

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरील शिवसेनेचा दावा कायम आहे. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. किरण सामंत यांनी केलेलं ट्विट मागे घेतलं आहे. शिवसेनेकडून एकच उमेदवार आहे. काल रात्रीचा निर्णय भावनिक होता. शिंदे यांना त्रास होऊ नये म्हणून सर्व पदाधिकार्‍यांशी रत्नागिरीला बैठक घेऊन चर्चा करू, रत्नागिरीची जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे. कार्यकर्त्यांची भावना असल्याचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी माघार घेतली, मात्र त्या जागेवर आमचा दावा कायम आहे अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. काल रात्रीचा निर्णय भावनिक होता. मात्र ही जागा आमच्याकडेच राहावी अशी सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. शिंदेंना वाटाघाटी कराव्या लागतात याचं वाईट वाटतं, अशी खंत देखील त्यांनी या वेळी व्यक्त केली. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून तिकीट मिळवण्याच्या शर्यतीतून किरण सामंत यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. या संदर्भातील एक पोस्ट देखील व्हायरल झाली, मात्र किरण सामंतांकडून ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून आमचा प्रयत्न आहे. मतदारसंघावर आमचा दावा कायम आहे.

तिकीट देण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. आम्ही राज्यात 45 पार नक्की जाऊ, फॉर्म्युला ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे आहे. जो काही फॉर्म्युला ठरेल तो आम्हा कार्यकर्त्यांना मान्य असेल, असेही उदय सामंत म्हणाले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news