गृहमंत्रालयाकडून ५ स्वयंसेवी संस्थांचे ‘FCRA’ परवाने रद्द | पुढारी

गृहमंत्रालयाकडून ५ स्वयंसेवी संस्थांचे 'FCRA' परवाने रद्द

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) परदेशी अनुदानाच्या गैरवापरासह अन्य नियमांचे उल्लंघन केल्याचा हवाला देत पाच प्रमुख स्वयंसेवी संस्थांचे (एनजीओ) विदेशी योगदान नियमन कायदा (FCRA) परवाने रद्द केले आहेत. धार्मिक सहभाग, परदेशी अनुदानांचा गैरवापर, यासह इतर गोष्टींबद्दल गृहमंत्रालयाने ३१ मार्च पर्यंत केलेल्या छाननीनंतर ही कारवाई केली आहे.

या एनजीओंमध्ये (NGOs) सीएनआय सिनोडिकल बोर्ड ऑफ सोशल सर्विस (CNI-SBSS), भारतीय स्वयंसेवी आरोग्य संघटना (VHAI), इंडो-ग्लोबल सोशल सर्व्हिस सोसायटी (IGSSS), चर्च असिस्टंट फॉर सोशल अॅक्शन (CASA), इव्हँजेलिकल फेलोशिप ऑफ इंडिया (EFOI) यांचा समावेश आहे.

विदेशी निधी प्राप्त करण्यासाठी विदेशी योगदान (नियमन) कायद्यांतर्गत परवाना अनिवार्य आहे. परवाना रद्द केल्याने या स्वयंसेवी संस्था परदेशी निधी प्राप्त करण्यास अपात्र ठरतात.

हेही वाचा : 

Back to top button