Stock Market Updates | २०२४-२५ च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी Nifty50 चा नवा उच्चांक | पुढारी

Stock Market Updates | २०२४-२५ च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी Nifty50 चा नवा उच्चांक

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजार आज सोमवारी (दि.१ एप्रिल) सलग तिसऱ्या सत्रांत तेजीत खुला झाला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ५०० अंकांनी वाढून ७४,२०० च्या अंकाला स्पर्श केला. तर निफ्टीने २०२४-२५ च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे शिखर गाठले. निफ्टीने २२,५३० चा नव्या उच्चांक नोंदवला. बाजारातील तेजीला मेटल, मीडिया, बँकिंग आणि फायनान्सियल क्षेत्रांचा सपोर्ट मिळला आहे.

महागाईत काही प्रमाणात घट झाल्यामुळे अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह जूनमध्ये व्याजदरात कपात करण्याची आशा आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत.

आजच्या सुरुवातीच्या तेजीमुळे बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४.७ लाख कोटी रुपयांनी वाढून ३९१.६७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

सेन्सेक्सवर जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, एलटी, एम अँड एम, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक, एसबीआय हे शेअर्स सर्वाधिक वाढून व्यवहार करत आहेत. तर टायटन, भारती एअरटेल या शेअर्समध्ये किरकोळ घसरण दिसून आली आहे. बीएसई मिडकॅप १.३ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप २ टक्क्यांनी वाढला आहे.

निफ्टीवर जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, अपोलो हॉस्पिटल, एलटी, हिंदाल्को हो शेअर्स टॉप गेनर्स आहेत. तर टायटन, हिरो मोटोकॉर्प या शेअर्समध्ये किरकोळ घसरण दिसून येत आहे. निफ्टी बँक ०.८ टक्क्यांनी तर निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस निर्देशांक १ टक्क्याने वाढला आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button