LS elections 2024 : काँग्रेसला आणखी एक धक्‍का! सावित्री जिंदाल यांचाही पक्षाला रामराम | पुढारी

LS elections 2024 : काँग्रेसला आणखी एक धक्‍का! सावित्री जिंदाल यांचाही पक्षाला रामराम

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नवीन जिंदाल यांच्‍या आई आणि देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनीही काँग्रेस पक्षाच्‍या सदस्‍यत्‍वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून ही माहिती दिली.

नुकतेच काँग्रेस नेते नवीन जिंदाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने त्यांना कुरुक्षेत्र मतदारसंघातून उमेदवारीही दिली आहे. आता नवीन जिंदाल यांची आई आणि देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनीही काँग्रेस सोडली आहे.

LS elections 2024 : कोण आहेत सावित्री जिंदाल?

भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत सावित्री जिंदाल यांचे नाव आघाडीवर आहे. त्या ८४ वर्षांच्या आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, 28 मार्च 2024 पर्यंत, सावित्री जिंदाल यांची एकूण संपत्ती $29.6 अब्ज आहे. भारतीय चलनात त्‍याचे मूल्‍य सुमारे २.४७ लाख कोटी रुपये इतके होते. आंतरराष्‍ट्रीय पातळीवर सावित्री जिंदाल जगातील अब्जाधीशांच्या यादीत 56 व्या स्थानावर आहेत.

सावित्री जिंदाल यांची राजकीय कारकीर्द

जिंदाल ग्रुपचे संस्थापक ओपी जिंदाल यांचे २००५ मध्ये विमान अपघातात निधन झाले. त्‍यांच्‍या पत्‍नी सावित्री जिंदाल हरियाणा विधानसभेतील हिसार मतदारसंघातून निवडून आल्‍या. त्‍यांनी 2009 मध्ये हिसारमधून पुन्हा निवडणूक जिंकली. ऑक्टोबर 2013 मध्ये त्यांना हरियाणा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाल्‍या.. 2006 मध्ये त्यांनी शहरी स्थानिक संस्था आणि गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. मात्र, 2014 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत सावित्री जिंदाल यांना हिसारमधून पराभवाला सामोरे जावे लागले होते.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button