AAP DP Campaign: ‘आप’चा आता सोशल माीडियातून एल्गार; देशभरात राबवणार ‘ही’ मोहीम | पुढारी

AAP DP Campaign: 'आप'चा आता सोशल माीडियातून एल्गार; देशभरात राबवणार 'ही' मोहीम

पुढारी ऑनलाईन डेस्क: आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अटक झाली आहे. सध्‍या ते ‘ईडी’ कोठडीत आहेत. या कारवाईविराेधात देशभरातील आप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज (दि.२५) होळीचा सण असताना देखील आप कार्यकर्त्यांनी रंग न उधळण्याचा आणि होळी साजरी न करण्याचा संकल्प केला होता. त्यानंतर आता आपने देशभरात ‘डीपी कॅम्पेन’ सुरू केले आहे. या संदर्भातील माहिती मंत्री आतिशी यांनी PTI शी बोलताना दिली . (AAP DP Campaign)

आप सुरू  करणार ‘डीपी’ मोहीम

दिल्‍लीच्‍या अर्थमंत्री नेत्या आतिशी यांनी म्हटले आहे की, “अरविंद केजरीवाल यांचा संदेश प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी, आज आप सोशल मीडियावर देशभरात ‘डीपी’ मोहीम सुरू करत आहे.  सोमवार, २५ मार्चला दुपारी 3 वाजल्‍यापासून ही मोहिम सुरू होईल.  देशभरातील आपचे सर्व नेते आणि पक्ष कार्यकर्ते त्यांचे डीपी बदलतील आणि ‘मोदींची सर्वात मोठी भीती आहे ‘केजरीवाल’ असा संदेश देतील, असेही त्या म्हणाल्या. (AAP DP Campaign)

दिल्लीचे मुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल यांना भाजपने खोट्या प्रकरणात अडकवले आहे. ईडीचा वापर करून त्यांना तुरुंगात टाकले आहे. निवडणूक जाहीर होताच, त्यांना केजरीवालांना तुरुंगात का टाकले? कारण भाजपचा असा विश्वास आहे की, हा एकच नेता आहे जो पंतप्रधान मोदींना आव्हान देऊ शकतात ते अरविंद केजरीवाल आहेत,” असा दावाही आतिशी यांनी केला आहे.  (AAP DP Campaign)

AAP DP Campaign
AAP DP Campaign

हे ही वाचा:

Back to top button