Arvind Kejriwal’s ED arrest | भारताच्या इतिहासात प्रथमच विद्यमान मुख्यमंत्र्यांना पुरावा नसताना अटक; सिंघवींचा जोरदार युक्तिवाद | पुढारी

Arvind Kejriwal's ED arrest | भारताच्या इतिहासात प्रथमच विद्यमान मुख्यमंत्र्यांना पुरावा नसताना अटक; सिंघवींचा जोरदार युक्तिवाद

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना ईडीने गुरुवारी रात्री अटक केली. दरम्यान आज (दि.२२) त्यांना राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणी दरम्यान अरविंद केजरीवाल हेच दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा दावा ईडीची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी केला. तर याला अरविंद केजरीवाल यांची बाजू मांडताना अभिषेक मनू सिंघवी यांनीही जोरदार युक्तिवाद केला. विद्यमान मुख्यमंत्री पदावर असताना अटक हे भारताच्या इतिहासात प्रथमच घडल्याचे सिंघवी म्हणाले. (Arvind Kejriwal’s ED arrest)

कोणताही थेट पुरावा नाही. अंमलबजावणी संचालनालयाच्या ताब्यात कोणतीही सामग्री नसताना, ज्याच्या आधारावर अरविंद केजरीवाल यांना एखाद्या गुन्ह्यासाठी दोषी असल्याचे मानले जात आहे. त्यामुळेदिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून बेकायदेशीरपणे आणि मनमानीपणे अटक केली असल्याचा युक्तिवाद अभिषेक मनू सिंघवी यांनी केला. (Arvind Kejriwal’s ED arrest)

थेट पुरावा नसताना, अटकेची गरज काय?; अभिषेक मनू संघवी

मद्य धोरण घोटाळा प्रकरणात वरिष्ठ वकील अभिषेक मनू संघवी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची बाजू मांडली. यावेळी ते म्हणाले, पहिली गोष्ट म्हणजे अटकेची गरज काय? अटकेची ताकद अटकेच्या गरजेइतकी नाही. तुम्हाला अटक करण्याचा अधिकार आहे याचा अर्थ तुम्ही अटक कराल असा नाही. तुमच्याकडे शक्ती आहे याचा अर्थ तुम्ही ती वापराल असा नाही. अटक करण्याची गरज सांगणारा कायदा मी दाखवून देईन, असे मनू सिंघवी म्हणाले. (Arvind Kejriwal’s ED arrest)

ईडी रिमांड स्वयंचलित नाही; सिंघवींचा दावा

मला वस्तुस्थितीपेक्षा मुद्द्यांवर लक्ष द्यायचे आहे. हे चार-पाच पैलू आहेत. अटक करण्याची गरज नाही. अटकेशिवाय ते माहिती देऊ शकत नाही हे दाखवण्यासारखे काहीही नाही. भारताच्या इतिहासात विद्यमान मुख्यमंत्र्याला अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. केजरीवाल यांना पाठवण्यात आलेले प्रथम ईडी रिमांड स्वयंचलित नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. त्यामुळे कलम १९ चे समाधान करणे आवश्यक आहे, असेही अभिषेक मनू संघवी यांनी सुनावणीदरम्यामन सूचित केले.

मतदान होण्यापूर्वीच तुमच्याकडे निकाल; केजरीवालांच्या वकिलांचा युक्तिवाद

कलम १९ (१) मध्ये ‘त्यांच्या ताब्यातील साहित्यावरून समाधान होत नसल्यास तुम्ही माझ्या घरी येऊन अटक करू शकता. तसेच गुन्हा सिद्ध झाल्यास तुम्ही अटक करू शकता, असेही नमूद केल्याचे संघवी यांनी स्पष्ट केले. कारण आणि विश्वासाशिवाय तुम्ही अटक करू शकत नाही. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह पक्षाच्या चार प्रमुख नेत्यांना पहिल्यांदाच अटक झाली आहे. याचा अर्थ मतदान होण्यापूर्वीच तुमच्याकडे निकाल आहे, असा युक्तीवाददेखील मनु सिंघवी यांनी केला आहे.

हेही वाचा:

Back to top button