Stock Market Closing Bell | सेन्सेक्स सलग तिसऱ्या दिवशी वाढून बंद, ऑटो, फार्मा, रियल्टी तेजीत, IT शेअर्स घसरले | पुढारी

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स सलग तिसऱ्या दिवशी वाढून बंद, ऑटो, फार्मा, रियल्टी तेजीत, IT शेअर्स घसरले

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी आज शुक्रवारी (दि. २२) सलग तिसऱ्या दिवशी सत्रांत वाढून बंद झाले. आज बाजारात काही प्रमाणात अस्थिरता दिसून आली. सेन्सेक्स १९० अंकांनी वाढून ७२,८३१ वर बंद झाला. तर निफ्टी ८४ अंकांच्या वाढीसह २२,०९६ वर स्थिरावला. (Stock Market Closing Bell)

मेटल, ऑटो, रियल्टी, एफएमसीजी, कॅपिटल गुड्स, हेल्थकेअर आणि ऑइल अँड गॅस ०.५-१ टक्क्यांनी वाढले. तर आयटी निर्देशांक २ टक्क्यांनी घसरला. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.३ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक १ टक्क्यांनी वाढला.

दरम्यान, बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २.२८ लाख कोटी रुपयांनी वाढून ३८२.१३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

टेक दिग्गज कंपनी Accenture ने संपूर्ण वर्षाच्या महसूल वाढीचा अंदाज कमी केल्यानंतर आयटी शेअर्समध्ये कमकुवतपणा दिसून आला. पण इतर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये खरेदी झाल्याने तोटा कमी झाला. या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने कमी प्रमाणात वाढ नोंदवली आहे.

टॉप गेनर्स, टॉप लूजर्स

सेन्सेक्सवर सन फार्मा, मारुती, इंडसइंड बँक, टायटन, आयटीसी, एलटी, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, टाटा स्टील हे शेअर्स सर्वाधिक वाढले. तर इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक, टीसीएस, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स घसरले.

sensex closing

निफ्टीवर यूपीएल, मारुती सुझुकी, हीरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो आणि सन फार्मा हे टॉप गेनर्स होते. तर विप्रो, इन्फोसिस, LTIMindtree, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि टीसीएस हे शेअर्स घसरले.

Nifty IT घसरला

IT वगळता आज इतर सर्व प्रमुख क्षेत्रांत तेजीत व्यवहार दिसून आला. यूएस फेडने २०२४ मध्ये व्याजदर कपातीसाठी त्यांचा दृष्टीकोन कायम ठेवल्याने आशावाद वाढला आहे. निफ्टी ऑटो, मीडिया, फार्मा आणि रियल्टी प्रत्येकी सुमारे १ टक्क्यांनी वाढून बंद झाले. तर निफ्टी आयटी २.३ टक्क्यांनी घसरला.

दरम्यान, २५ मार्चला होळीनिमित्त बाजार बंद राहणार आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button