Investment Plan: तुम्हालाही गुंतवणूक करायची आहे? जाणून घ्या टॉप अप SIP म्हणजे काय? | पुढारी

Investment Plan: तुम्हालाही गुंतवणूक करायची आहे? जाणून घ्या टॉप अप SIP म्हणजे काय?

नीलेश पुजारी, करसल्लागार

सिस्टॅमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही म्युच्युअल फंडमधील ही गुंतवणूक योजना असून या माध्यमातून आपण आपला पैसा हा एकाचवेळी गुंतवणूक करण्यापेक्षा दरमहा गुंतवत राहता. मासिक गुंतवणुकीत पुन्हा निश्चित रक्कम दरवर्षी वाढवत गेलो तर त्यास टॉप अप किंवा स्टेप अप एसआयपी असे म्हणतो. (Investment Plan)

उदा. आपण दहा हजारांची एसआयपी सुरू केली असेल आणि आपण वर्षभरात दरमहा दहा हजार रुपये जमा करतो. त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे 13 ते 24 महिन्यांपर्यंत या रकमेला दहा टक्क्यांनी वाढ केली तर आपण 13 ते 24 व्या महिन्यांपर्यंत दहा हजारांऐवजी 11 हजार रुपये मासिक जमा करत राहाल. यानंतर 25 महिन्यांपासून 36 महिन्यांपर्यंत पुन्हा एकदा दहा टक्के वाढविली तर एसआयपीची रक्कम ही 12,100 रुपये होईल. यानुसार दरवर्षी एसआयपीची दहा टक्के रक्कम वाढत जाईल. (Investment Plan)

Investment Plan: ‘टॉप अप’ एसआयपीची आकडेमोड

टॉप अप एसआयपीचा फायदा एका उदाहरणाने समजून घेऊ. 35 वर्षाच्या सुरेशने आपल्या मुलीच्या विवाहासाठी पुढील 20 वर्षांपर्यंत दरमहा दहा हजारांची एसआयपीचा पर्याय निवडला. त्यानेदेखील दरवर्षी दहा टक्के एसआयपीची रक्कम वाढविण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे मोहनने वीस वर्षांची एसआयपी सुरू केली. त्याचीही रक्कम दरमहा दहा हजार होती, पण त्याने स्टेप अप एसआयपीचा पर्याय निवडला नाही. त्याने नॉर्मल एसआयपी ठेवली. या दोघांना 12 टक्के वार्षिक परतावा मिळाला, असे गृहित धरा. आता वीस वर्षांनंतर या दोघांकडे किती फंड जमा झाला ते पाहू. (Investment Plan)

टॉप अप एसआयपी आणि नियमित एसआयपी यात फरक असतो. एसआयपी दरवर्षी दहा टक्के वाढ केल्याने वीस वर्षांत 68,73,000 रुपयांची गुंतवणूक झाली. पण 12 टक्के परतावा गृहित धरला तर त्याच्या फंडमध्ये एकूण दोन कोटी रुपये जमा झाले. म्हणजे 1.30 कोटी रुपयांचा फायदा झाला. त्याचवेळी नियमित एसआयपीच्या माध्यमातून 24 लाखांची गुंतवणूक झाल्यावर एक कोटी रुपये जमा झाले. म्हणजे 76 लाख रुपयांचा फायदा झाला. याप्रमाणे दोन्ही प्रकरणांत 71 टक्क्यांचा फरक आहे.

एसआयपी टॉप अप कशासाठी

साधारणपणे नोकरदार वर्गांची दरवर्षी वेतनवाढ होते. त्यामुळे एसआयपीची रक्कम वाढविणे सोपे जाते; परंतु बहुतांश मंडळी वेतन वाढवूनही एसआयपीची रक्कम वाढविण्याबाबत उदासीन असतात आणि अवांतर खर्च करत राहतात. त्यामुळे दीर्घकाळात गुंतवणूक करूनही अपेक्षेप्रमाणे लाभ मिळत नाही. आपण वाढीव वेतनाच्या वाटा गुंतवणुकीसाठी सतत वापरत असाल तर आर्थिक ध्येय सहजपणे पार करू शकता. टॉप अप एसआयपी ही टप्प्याटप्प्यांनी गुंतवणूक वाढविणार्‍या लोकांसाठी उपयुक्त आहे. नवीन आणि अनुभवी असे दोन्ही प्रकारचे गुंतवणूकदार स्टेप अप एसआयपीची निवड करून दीर्घकाळासाठी मोठे भांडवल उभा करू शकतात.

टॉप अप एसआयपी ही टप्प्याटप्प्यांनी गुंतवणूक वाढविणार्‍या लोकांसाठी उपयुक्त आहे. नवीन आणि अनुभवी असे दोन्ही प्रकारचे गुंतवणूकदार स्टेप अप एसआयपीची निवड करून दीर्घकाळासाठी मोठे भांडवल उभा करू शकतात.

Back to top button