HUL Layoffs | हिंदुस्तान युनिलिव्हरचा मोठा निर्णय, ७,५०० कर्मचाऱ्यांना नारळ, कारण काय? | पुढारी

HUL Layoffs | हिंदुस्तान युनिलिव्हरचा मोठा निर्णय, ७,५०० कर्मचाऱ्यांना नारळ, कारण काय?

पुढारी ऑनलाईन : हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) ची पेरेंट कंपनी युनिलिव्हरने ७,५०० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखली आहे. तसेच कंपनीने खर्चात कपात करण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून त्यांचे आईस्क्रीम युनिट स्वतंत्र व्यवसाय म्हणून वेगळे करण्याची घोषणा केली आहे. पुढील वर्षाच्या अखेरीस कंपनीत पुनर्रचनेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे कंपनीने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (HUL Layoffs)

‘कंपनी बोर्डाने निर्णय घेतला आहे की आईस्क्रीम युनिट वेगळे करणे हे आईस्क्रीम आणि युनिलिव्हर या दोन्हींच्या भविष्यातील वाढीसाठी महत्त्वाचे आहे. दोन्ही वेगळे होण्याची प्रक्रिया तत्त्काळ सुरू होईल. पुढील माहिती योग्य वेळी दिली जाईल. कंपनीच्या प्रस्तावित बदलांचा जागतिक स्तरावर मुख्यतः ७,५०० मनुष्यबळावर परिणाम होण्याची शक्यता आहे. एकूण पुनर्रचना खर्च आता पुढील तीन वर्षांसाठी समुहाच्या उलाढालीच्या सुमारे १.२ टक्के अपेक्षित आहे,’ असे हिंदुस्तान युनिलिव्हरने नमूद केले आहे.

आईसक्रीम युनिट वेगळे करण्यामुळे युनिलिव्हरच्या व्यवस्थापनाला ऑक्टोबर २०२३ मध्ये घोषित केलेल्या ग्रोथ अॅक्शन प्लॅनच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी मदत करेल, असेही कंपनीने पुढे म्हटले आहे. “आईस्क्रीमचे ऑपरेटिंग मॉडेल खूप वेगळे आहे. यामुळे बोर्डाने निर्णय घेतला आहे की आईस्क्रीम युनिट वेगळे करणे आईस्क्रीम आणि युनिलिव्हर या दोघांच्या भविष्यातील वाढीसाठी सर्वोत्तम आहे,” असा दावा युनिलिव्हरने केला आहे. (HUL Layoffs)

HUL भारतीय बाजारात मॅग्नम, क्वालिटी वॉल्स आणि कॉर्नेटो या तीन आईस्क्रीम ब्रँडसह कार्यरत आहे. HUL आईस्क्रीम व्यवसाय फूड आणि रिफ्रेशमेंट विभागांतर्गत येतो. त्याचा त्यांच्या कमाईत २५ टक्के योगदान देतो. त्याचा क्वालिटी वॉलचा मोबाईल व्हेंडिंग उपक्रम ‘आय ॲम वॉल्स’ने देशभरातील सुमारे १२,६०० लोकांना आणि २५० दिव्यांगांना उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

हे ही वाचा :

Back to top button