झारखंड मुक्‍ती मोर्चाला माेठा धक्‍का, Sita Soren यांनी दिला पक्षाच्‍या सदस्यत्वाचा राजीनामा | पुढारी

झारखंड मुक्‍ती मोर्चाला माेठा धक्‍का, Sita Soren यांनी दिला पक्षाच्‍या सदस्यत्वाचा राजीनामा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लाेकसभा निवडणुकीच्‍या ताेंडावर  झारखंडमधील सत्ताधारी पक्ष झारखंड मुक्‍ती मोर्चाला आज ( दि. १९ मार्च) मोठा धक्‍का बसला. आमदार सीता सोरेन यांनी पक्षाच्‍या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जामा मतदारसंघातील आमदार आणि झारखंडचे माजी मुख्‍यमंत्री हेमंत सोरेन यांचे मोठे बंधू दुर्गा सोरेन यांच्‍या पत्‍नी अशी  सीता सोरेन यांची राजकीय ओळख आहे. ( Sita Soren has resigned from the membership of JMM )

नाराजीचे कारण काय?

जमीन घोटाळा प्रकरणी झारखंडचे मुख्‍यमंत्री हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिला. त्‍यांना सक्‍तवसुली संचालनालयाने  (ईडी)  जानेवारी राेजी अटक केली हाेती. यानंतर राज्‍याच्‍या सत्तेची सुत्रे हेमंत सोरेन यांचे बंधू चंपाई सोरेन यांच्‍याकडे केली. मुख्‍यमंत्रीपदावर सीता यांना दावा सांगितला हाेता. यानंतर चंपाई सोरेन मंत्रीमंडळात सीता सोरेन यांना स्‍थान दिले गेले नाही. यामुळे मागील काही दिवासांपासून सीता सोरेन नाराज होत्‍या. अखेर त्‍यांनी आज पक्षाच्‍या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ( Sita Soren has resigned from the membership of JMM )

माझा कुटुंबाविरोधात मोठा कट रचला जात आहे

सीता सोरेन यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी पत्र लिहून पक्षाध्यक्षांना म्हणजेच त्यांचे सासरे शिबू सोरेन यांना पाठवले आहे. सीता म्हणाली की, माझ्या आणि माझ्या कुटुंबाविरोधात मोठा कट रचला जात आहे.मी झारखंड मुक्ती मोर्चाची केंद्रीय महासचिव आणि सक्रिय सदस्य आहे. सध्या मी पक्षाचा आमदार आहे. अत्यंत दुःखी अंत:करणाने मी माझा राजीनामा सादर करत आहे.

पूर्वीचा झारखंड मुक्‍ती मोर्चा राहिला नाही

सीता यांनी म्‍हटलं आहे की, माझे दिवंगत पती दुर्गा सोरेन हे झारखंड मुक्‍ती चळवळीचे योद्धा आणि महान क्रांतिकारक होते. त्यांच्या मृत्यूपासून मी आणि माझ्‍या कुटुंबाकडे सातत्‍याने दुर्लक्ष झाले आहे. पक्ष आणि कुटुंबीयांनी आम्हाला एकटे पाडले आहे. माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक होते. कालांतराने परिस्थिती सुधारेल अशी मला आशा होती; पण दुर्दैवाने तसे झाले नाही. माझे पती दुर्गा सोरेन यांनी त्याग आणि समर्पण आणि नेतृत्व क्षमतेवर झारखंड मुक्ती मोर्चा हा एक महान पक्ष उभा केला. आज तो पक्ष राहिला नाही. ज्यांची दृष्टी आणि उद्दिष्टे आपल्या मूल्ये आणि आदर्शांशी जुळत नाहीत अशा लोकांच्या हातात पक्ष आता गेला आहे हे पाहून मला खूप दुःख झाले.

शिबू सोरेन (गुरुजी बाबा) यांनी आम्हा सर्वांना एकत्र ठेवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. दुर्दैवाने,अथक प्रयत्न करूनही तो अयशस्वी झाला. माझ्या आणि माझ्या कुटुंबाविरुद्ध एक खोल कट रचला जात असल्याचे मला नुकतेच कळले आहे. मी अत्यंत दुःखी आहे. झारखंड मुक्ती मोर्चा आणि या कुटुंबाला सोडायचे आहे, असे मी ठामपणे ठरवले आहे. मी माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मी तुमचा आणि पक्षाचा सदैव ऋणी राहीन, असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

२००९ मध्‍ये शिबू सोरेन यांचे मोठे पुत्र दुर्गा सोरेन यांचा बोकारो येथे यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. ते अवघे ३९ वर्षांचे होते. मृत्यूचे कारण मूत्रपिंड निकामी झाल्याचे सांगण्यात आले. दुर्गा सोरेन यांच्‍या मृत्‍यूनंतर हेमंत सोरेन यांच्‍याकडे झारखंड मुक्‍ती मोर्चाची  सूत्रे आली.

सीता सोरेन यांचा राजकीय प्रवास

ओडिशातील मयूरभंज येथे जन्मलेल्या सीता सोरेनने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्‍यांना वाचनाची आवड आहे. मुन्शी प्रेमचंद्र यांना साहित्य क्षेत्रातील आपला आदर्श मानतात. सीता सोरेन यांनी राज्यातील बेकायदेशीर खाणकाम आणि वाहतुकीच्या मुद्द्यावर अनेकदा आवाज उठवला आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये सीता सोरेन यांच्‍या दोन मुली राजश्री सोरेन आणि जयश्री सोरेन यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने पक्ष स्थापन केला. त्याचे नाव होते दुर्गा सोरेन सेना. राज्यातील भ्रष्टाचार, विस्थापन, जमीन लुटणे आणि इतर समस्यांविरुद्ध लढा देणे हा यामागचा उद्देश असल्याचे दोन्ही मुलींनी सांगितले होते. त्यांची मुलगी राजश्रीने बिझनेस मॅनेजमेंटचे तर जयश्रीने कायद्याचे शिक्षण घेतले आहे.

सीता सोरेन स्वतःचे नुकसान करत आहेत: मनोज पांडे

झारखंड मुक्‍ती मोर्चाचे नेते मनोज पांडे म्हणाले की, ‘सीता सोरेन यांनी राजीनामा दिल्‍याची माझ्याकडे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही; पण जर ही माहिती खरी असेल तर ही खूपच वाईट बातमी आहे. आम्ही त्यांना पक्षाचे महत्त्वाचे सदस्य मानतो. आम्हाला आशा आहे की, त्‍या आपल्‍या विचाराचा पुनर्विचार करतील. त्‍यांना झारखंड मुक्‍ती मोर्चा पक्षात मिळालेला मान अन्‍य कोणत्‍याही पक्षात मिळणार नाही. . आमच्‍या राजकीय विरोधकांचा त्‍यांच्‍यावर प्रभाव पडला असेल तर त्‍या स्वतःचेच नुकसान करत आहे, असेही पांडे म्‍हणाले.

हेही वाचा :

 

Back to top button