Delhi Excise Policy Case : सिसोदियांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत ६ एप्रिलपर्यंत वाढ | पुढारी

Delhi Excise Policy Case : सिसोदियांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत ६ एप्रिलपर्यंत वाढ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्‍लीतील मद्य घोटाळाप्रकरणी आज (दि.19 मार्च) दिल्‍लीत राऊस एव्हेन्यू न्‍यायालयाने दिल्‍लीचे माजी उपमुख्‍यमंत्री मनीष सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत ६ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

काय आहे प्रकरण ?

दिल्ली सरकारने 2021-22 च्या उत्पादन शुल्क धोरणांतर्गत ज्या दारू (मद्य) व्यापाऱ्यांना परवाने दिले होते, त्यांनी त्यासाठी लाच दिली होती. परवानेही आम आदमी पार्टीच्‍या मर्जीतील मद्य व्यापाऱ्यांनाच दिले गेले होते, असा आरोप आहे. आम आदमी पक्षाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी अनियमिततेमुळे मद्य धोरण रद्द केले होते आणि सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. कथित मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीनेही गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय)  सिसोदिया यांना अटक केली होती. यानंतर त्‍यांनी वारंवार दाखल केलेले जामीन अर्जही न्‍यायालयाने फेटाळले आहेत.

हेही वाचा :

 

Back to top button