मोठी बातमी | बिहारमध्ये ‘NDA’ला धक्का, ‘या’ केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा

Pashupati Kumar Paras
Pashupati Kumar Paras

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभेच्या तोंडावरच भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी सरकारला मोठा धक्क बसला आहे. कारण लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष कुमार पारस यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाचा राजीनामा दिला आहे. ते बिहारमधील जागावाटपासंदर्भात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. एनडीएकडून बिहार जागा वाटप झाल्यानंतर दोन दिवसातच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. राजीनामा देण्यापूर्वी पशुपती पारस मोदी सरकारमध्ये अन्न आणि प्रक्रिया मंत्री होते. (Pashupati Kumar Paras)

पशुपती कुमार पारस यांनी मोदी मंत्रिमंडळ सोडले

बिहारमधील जागावाटपानंतर केंद्रीय मंत्री आणि चिराग पासवान यांचे काका पशुपती कुमार पारस यांनी मोदी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. पारस यांनी मंगळवारी (दि.१९) दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. पारस म्हणाले की, त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. खरे तर सोमवारी (दि.१८) सायंकाळी झालेल्या जागावाटपात पशुपती पारस यांना बिहारमध्ये एकही जागा मिळाली नाही, त्यानंतर ते कधीही एनडीए सोडू शकतात, असे मानले जात होते.

बिहारमध्ये 'NDA'ची चिराग यांच्याशी जवळीक

बिहारमधील एनडीएच्या जागावाटपात पशुपती कुमार पारस यांचा पुतण्या चिराग पासवानच्या एलजेपीला (रामविलास) ५ लोकसभेच्या जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे देखील पशुपती पारस हे एनडीएवर नाराज आहेत. एनडीएने बिहारमधील लोकसभा जागावाटपाच्या घोषणेपूर्वी पशुपती पारस यांच्याशी कोणतेही बोलणे केले नव्हते. तसेच त्यांच्या पक्षाला एकही जागा न दिल्याने त्यांची सर्वात मोठी नाराजी आहे, त्यामुळेच पशुपती यांनी मंत्रीमंडळ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

'माझ्यावर आणि माझ्या पक्षावर अन्याय'; पशुपती कुमार पारस

सोमवारी (दि.१८) सायंकाळी झालेल्या एनडीएच्या जागावाटपात रिकाम्या हाताने राहिल्यानंतर आरएलजेपी प्रमुख पशुपती पारस यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. पशुपती पारस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत मंत्रीपदाचा राजीनामा जाहीर केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, 'माझ्यावर आणि माझ्या पक्षावर अन्याय झाला. आम्हाला एकही जागा देण्यात आली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

बिहारमध्ये भाजप 17, तर जेडीयू 16 जागा लढवणार

बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये जागावाटपाची नुकतिच घोषणा झाली आहे. येथेही भाजप पुन्हा एकदा मोठ्या भावाच्या भूमिकेत आला आहे. बिहारमध्ये भाजप 17 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर जेडीयूच्या वाट्याला 16 जागा आल्या आहेत. इतर मित्रपक्षांबद्दल बोलायचे झाले तर चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला (रामविलास) 5 जागा, जीतन राम मांझी यांच्या पक्ष HAM ला 1 जागा आणि उपेंद्र कुशवाह यांच्या पक्ष राष्ट्रीय लोक जनता दलाला एक जागा मिळाली आहे. मात्र यामध्ये पशुपती पारस यांच्या आरएलजेपीला एकही जागा देण्यात आलेली नाही.

हे ही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news