पुढारी ऑनलाईन : तमिलिसाई सुंदरराजन (वय ६२) यांनी तेलंगणाच्या राज्यपाल आणि पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतची माहिती राजभवनकडून देण्यात आली आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती भवनाकडे पाठवला आहे. त्यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. (Tamilisai Soundararajan resigns)
२०१९ पर्यंत तामिळनाडू भाजपच्या प्रमुख असलेल्या सुंदरराजन यांची सप्टेंबर २०१९ मध्ये तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांच्याकडे पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
नागर समुदायातील असलेल्या तमिलीसाई यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली होती. पण डीएमकेच्या कनिमोझी यांच्याकडून थुथुकुडीमध्ये त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या पुन्हा भाजपमध्ये सक्रिय होऊ शकतात. त्यांना तामिळनाडूमधील थुथुकुडीसह तीन लोकसभा मतदारसंघांपैकी कोणत्याही एका मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते.
सुंदरराजन यांचे पुद्दुचेरीतील लोकांशी अधिक जवळचे नाते असल्याचे भाजपला वाटते. यामुळे सध्या द्रविड मुन्नेत्र कळघमच्या खासदार असलेल्या कनिमोझी यांच्या थुथुकुडी जागेसह तामिळनाडूतील तीनपैकी एका जागेवरून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
त्यांनी तामिळनाडू विधानसभेची निवडणूकदेखील तीन वेळा लढवली होती. त्यांनी २००६ मध्ये राधापूरममधून, २०११ मध्ये वेलाचेरी आणि २०२६ मध्ये विरुगंपक्कममधून निवडणूक लढवली होती. तिन्हीवेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. (Tamilisai Soundararajan resigns)
हे ही वाचा :