Sidhu Moosewala Mother: तंत्रज्ञानाची कमाल | सिद्धू मुसेवालाच्या आईने ५८ व्या वर्षी दिला मुलाला जन्म; फोटो आला समोर | पुढारी

Sidhu Moosewala Mother: तंत्रज्ञानाची कमाल | सिद्धू मुसेवालाच्या आईने ५८ व्या वर्षी दिला मुलाला जन्म; फोटो आला समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क: पंजाबमधील गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला यांच्या आईने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. मुसेवालाची हत्या होऊन दोन वर्षे झाली आहेत. त्यानंतर आयव्हीएप (IVF) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सिद्धू मुसेवालाच्या आई चरण कौर यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला आहे. सिद्धूचे वडील बलकौर सिंह यांनी नवजात मुलासोबतचा पहिला फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. (Sidhu MooseWala Mother)

पंजाबी गायक सिद्धू मूसवालाची आई चरण कौर यांनी मुलाला जन्म दिला आहे. मूसवालाचे वडील बलकौर सिंह यांनी स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. सिद्धू मूसवालाचे वडील बलकौर सिंह यांनी आपल्या लहान मुलाचा फोटो शेअर करताना लिहिले, ‘शुभदीपवर प्रेम करणाऱ्या लाखो जीवांच्या आशीर्वादाने देवाने शुभच्या धाकट्या भावाला आमच्या पदरात दिले आहे. देवाच्या आशीर्वादाने बाळ आणि आई दोघेही निरोगी आहेत. सर्व हितचिंतकांच्या अपार प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे, असे देखील सिद्धू मुसेवाला यांच्या वडीलांनी म्हटले आहे. (Sidhu Moosewala Mother)

सिद्धूच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी घरात आनंद

2022 मध्ये मानसा जिल्ह्यातील शुभदीप सिंह उर्फ ​​सिद्धू मूसवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येची जबाबदारी गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांनी घेतली होती. सिद्धू हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या निधनाने घरामध्ये शोककळा पसरली होती. सिद्धू मूसवालाचे चाहते त्याच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनंतरही त्याला विसरलेले नाहीत. त्यांच्या निधनाने संगीतक्षेत्रात मोठी शोककळा पसरली होती. काही दिवसांपासून सिद्धू मूसवालाची आई चरण कौर गरोदर असल्याच्या बातम्या येत होत्या. त्याचवेळी दोन वर्षांनी मुलगा झाल्याने तिच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. (Sidhu Moosewala Mother)

चाहत्यांनी केले अभिनंदन

चरण कौर सिंग आणि बलकौर सिंग यांना पुन्हा पालक बनल्याबद्दल चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धू मूसवालाच्या आईने IVF च्या मदतीने मुलाला जन्म दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Balkaur Singh (@sardarbalkaursidhu)

हेही वाचा:

Back to top button