Sudha Murty Takes Oath | सुधा मूर्ती यांनी नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून घेतली शपथ | पुढारी

Sudha Murty Takes Oath | सुधा मूर्ती यांनी नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून घेतली शपथ

पुढारी ऑनलाईन डेस्क : लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर नामनिर्देशित केले होते. यानुसार सुधा मूर्ती यांनी आज (दि.१४) राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या सदस्य म्हणून शपथ घेतली. यावेळी इन्फोसिसचे संस्थापक आणि त्यांचे पती नारायण मूर्ती आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हेही उपस्थित होते. (Sudha Murty Takes Oath)

८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधत सुधा मुर्ती यांच्या नावाची राष्ट्रपती नियुक्त सदस्या म्हणून राज्यसभेवर घोषणा करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुधा मूर्ती यांची नियुक्ती केली असल्याची माहिती स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून दिली होती. त्यानंतर आज सुधा मूर्ती यांचा आज आज (दि.१४) शपथविधी पार पडला. (Sudha Murty Takes Oath)

सुधा मूर्ती ‘नारी शक्ती’चा एक शक्तिशाली पुरावा- PM मोदी

पीएम मोदींनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारताच्या राष्ट्रपतींनी इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांचे नामांकन केल्याने मला आनंद होत आहे. राज्यसभेत सामाजिक कार्य, परोपकार आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात सुधाजींचे योगदान प्रचंड आणि प्रेरणादायी आहे. राज्यसभेतील त्यांची उपस्थिती ही आमच्या ‘नारी शक्ती’चा एक शक्तिशाली पुरावा आहे. जी आपल्या देशाचे भवितव्य घडवण्यात तसेच महिलांच्या सामर्थ्याचे उदाहरण आहे. त्यांना फलदायी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छादेखील पीएम मोदींनी दिल्या आहेत.(Sudha Murty Takes Oath)

‘या’ सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित

इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती या मूर्ती ट्रस्टच्या अध्यक्ष म्हणून काम करतात. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. वयाच्या ७३ व्या वर्षी, आंतरराष्ट्रीय महिला दिनादिवशीच त्यांचे राज्यसभेवर नामांकन  झाले होते. त्यांना 2006 मध्ये पद्मश्री आणि 2023 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  (Sudha Murthy Appointed)

अनेक प्रेरणादायी पुस्तकांचे लेखन

सुधा मूर्ती या इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा होत्या. सोबतच त्या प्रसिद्ध लेखिकाही आहेत. सुधा या महिला आणि मुलांसाठी सतत काम करत आहेत. त्यांनी अनेक प्रेरणादायी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. वास्तविक, 1981 मध्ये इन्फोसिसच्या लॉन्चिंगवेळी सुधा मूर्ती यांनी स्वतः त्यांचे पती नारायण मूर्ती यांना 10,000 रुपये दिले होते.  त्यावेळी ते आणि त्यांचे कुटुंबीय भाड्याच्या घरात राहत होते;  असेही सुधा यांनी टीव्ही शोमधील एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते.

हे ही वाचा:

Back to top button