President Mauritius Visit: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा मॉरिशस विद्यापीठाकडून ‘मानद’ पदवी देऊन सन्मान | पुढारी

President Mauritius Visit: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा मॉरिशस विद्यापीठाकडून 'मानद' पदवी देऊन सन्मान

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॉरिशसच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांना मॉरिशस विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. या संदर्भातील माहिती मुर्मू यांनी स्वत: त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून दिली आहे. (President Mauritius Visit)

या पदवीला उत्तर देताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे की, “मॉरिशस विद्यापीठातून डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉची मानद पदवी मिळाल्याने मला विशेष गौरव वाटतो. मला आशा आहे की हे सर्व तरुणांना, विशेषत: तरुणींना त्यांची अनोखी आवड शोधण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास प्रेरित करेल”. (President Mauritius Visit)

मॉरिशस सोबतचे नाते अधिकाधिक उंचावत राहील; राष्ट्रपती मुर्मू

मला विश्वास आहे की, भारत आणि मॉरिशसच्या तरुणांमधील मैत्रीच्या बंधामुळे आमचे नाते अधिकाधिक उंचावत राहील, कारण भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या ‘अमृत काल’ प्रवासाला सुरुवात करत आहे. मी माझ्या मॉरिशियन मित्रांना त्यांच्या भारताशी असलेल्या विशेष जवळीकीचा लाभ घेण्याचे आवाहन करतो. आम्ही ऑफर करत असलेल्या अफाट आर्थिक संधींचा वापर करा, असे देखील मुर्मू यांनी म्हटले आहे. मॉरिशसचे लोक ज्या उत्साहाने होळी, दिवाळी, शिवरात्री, गणेश चतुर्थी, ईद असे सण साजरे करतात ते पाहण्यासारखे आहे. मॉरिशसमधील लोकांनीही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा केल्याचे त्या म्हणाल्या. (President Mauritius Visit)

भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा

मॉरिशस दौऱ्यादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांनी मॉरिशसचे पंतप्रधान जगन्नाथ यांची भेट घेतली. राष्ट्रपतींसोबत झालेल्या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी भारत आणि मॉरिशस यांच्यातील ऐतिहासिक आणि सखोल भागीदारीला अधिक गती देण्याच्या मार्गांवर चर्चा केली. भेटीदरम्यान, राष्ट्रपतींनी त्यांना रुपे कार्ड भेट दिले, जे नुकतेच मॉरिशसमध्ये लॉन्च झाले आहे.

हे ही वाचा:

Back to top button