yusuf sharif : टेम्पो चालवून भंगार व्यवसाय, शालेय शिक्षण नाही, पण १ हजार ७४४ कोटींची संपत्ती !

युसुफ शरीफ
युसुफ शरीफ
Published on
Updated on

बंगळूर; पुढारी ऑनलाईन

बंगळूरच्या शहरी भागातून विधान परिषदेसाठी काँग्रेसने उमेदवारी दिलेल्या उमेदवाराने शालेय शिक्षणही पूर्ण केलेले नाही. मात्र निवडणूक आयोगाला सुमारे १७०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. प्रतिज्ञापत्राची माहिती बाहेर येताच भंगार व्यापारी युसूफ शरीफ यांचे नाव सर्वांच्या जिभेवर आले. (yusuf sharif)

युसूफ शरीफ (yusuf sharif)) हे डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार आहेत. युसूफ शरीफ यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात १७४४ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. ते अब्जाधीश उमेदवार आहेत. परंतु, 1993 मध्ये बंगळुरूजवळ कोलारमध्ये ते टेम्पो चालवत असे.

yusuf sharif  : आणि टेम्पो चालवायला सुरुवात केली

युसूफ शरीफ(yusuf sharif) सांगतात की, आम्ही १४ भावंडं होतो, त्यामुळे आम्ही मध्येच शाळा सोडली आणि टेम्पो चालवायला सुरुवात केली, त्यानंतर भंगाराचा व्यवसाय केला आणि त्यानंतर रिअल इस्टेटचा व्यवसाय केला. युसूफ यांनी सांगितले की, मी भंगारातून सुरुवात केली, पण रिअल इस्टेटमधून पैसे कमावले. म्हणजेच भंगारातून लाखो आणि स्थावर मालमत्तेतून कोट्यवधींची कमाई झाली आहे. ते म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या आदेशाने मी विक्रीसाठी असलेली जमीन खरेदी करून विकतो.

कोलारसोबतच युसूफ शरीफ यांचे घरही बंगळुरूमध्ये आहे. रोल्स रॉयस कार दारातच उभी आहे. घरामध्ये गोल्ड प्लेटिंग फर्निचर खूप आकर्षक आहे. युसूफ म्हणाले की, 'माझा जन्म KGF मध्ये झाला आहे, म्हणजे अशा मातीत जिथे सोने सापडते, म्हणजेच सोन्याची माती. कोलार गोल्ड फील्ड म्हणजेच सोन्याची खाण बंगळूरपासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर आहे. आता या परिसराच्या समृद्धीमुळे नावही वेगळ्या शैलीत आहे. ते म्हणाले की, इथे सगळे मला KGF बाबू म्हणजेच कोलार गोल्ड फील्ड बाबू म्हणतात.

युसूफ (yusuf sharif) यांच्याकडे एका पंचतारांकित हॉटेलचे लॉनही आहे. गरजूंना मदत करणारे म्हणून ओळखले जाणारे युसूफ सांगतात, की ते आपल्या भागातील मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करेल. युसूफ म्हणाले की आमच्या मतदारसंघात सुमारे ३० लाख मुले सरकारी शाळांमध्ये शिकतात, त्या सर्वांना आर्थिक मदत आणि शिष्यवृत्ती देण्यास माझे प्राधान्य असेल. तथापि, युसूफ यांच्यावर रिअल इस्टेटशी संबंधित 3 आणि सुमारे 14 कोटी रुपयांच्या आयकर चोरीचा एक खटला देखील आहे.

हे ही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news