Global hunger crisis | भुकेचं संकट गंभीर! जगातील १० पैकी १ व्यक्ती रोज रात्री उपाशी झोपतो : UN

Global hunger crisis | भुकेचं संकट गंभीर! जगातील १० पैकी १ व्यक्ती रोज रात्री उपाशी झोपतो : UN
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : जगात भूकबळीची समस्या गंभीर बनली आहे. जगभरात ७०० दशलक्षाहून अधिक लोक भूकबळीच्या तीव्र संकटामुळे प्रभावित झाले आहेत आणि त्यांना एकावेळेचे अन्न मिळवण्यासाठी अनिश्चिततेचा सामना करावा लागत असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न एजन्सीने म्हटले आहे. मानवतेच्या कल्याणासाठीचा निधी कमी होत असताना अन्नाची मागणी सतत वाढत आहे. यामुळे भूकबळीची समस्या तीव्र बनली असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त एपी वृत्तसंस्थेने दिले आहे. (Global hunger crisis)

संबधित बातम्या

रोम येथून ७९ देशांमध्ये कार्यरत असलेल्या जागतिक अन्न कार्यक्रमाच्या (World Food Programme) अंदाजानुसार, जगातील लोकसंख्येपैकी १० पैकी एकाला दररोज रात्री उपाशी झोपावे लागते. या वर्षी ३४५ दशलक्षाहून अधिक लोकांना अन्नाविना उपाशी झोपावे लागत आहे; एवढी अन्न असुरक्षितची गंभीर समस्या बनली आहे. कोरोना साथीच्या पूर्वी २०२१ च्या सुरुवातीला सुमारे २०० दशलक्ष लोकांना अन्नाची टंचाई भासत होती. आता हे प्रमाण वाढले असल्याचे WFP ने नमूद केले आहे.

"आम्ही आता दीर्घकालीन संकटांचा सामना करत जगत आहोत. ही वास्तविकता आहे. आम्हाला पुढील अनेक वर्षांच्या परिणामाचा सामना करावा लागेल," असे जागतिक अन्न कार्यक्रमाच्या कार्यकारी संचालिका सिंडी एच. मॅककेन यांनी म्हटले आहे.

जागतिक अन्न कार्यक्रमाच्या (WFP) प्रमुख मॅककेन ह्या अमेरिकेचे सिनेटर जॉन मॅककेन यांच्या पत्नीदेखील आहेत. त्यांनी जगातील भूकबळीच्या भीषण वास्तवाची जाणीव करुन दिली आहे. या एजन्सीच्या अंदाजानुसार ५० पेक्षा जास्त देशांमध्ये सुमारे ४७ दशलक्ष लोक उपासमारीच्या मार्गावर आहेत.

Global hunger crisis : ४५ दशलक्ष मुले तीव्र कुपोषणामुळे त्रस्त

पाच वर्षांखालील सुमारे ४५ दशलक्ष मुले तीव्र कुपोषणामुळे त्रस्त आहेत. "आमचे सामूहिक आव्हान म्हणजे महत्त्वाकांक्षी, बहुक्षेत्रीय भागीदारी वाढवणे जे आम्हाला भूक आणि गरिबीचा प्रभावीपणे सामना करण्यास सक्षम करेल आणि दीर्घकालीन मानवतावादी गरजा कमी करेल," असे मॅककेन यांनी म्हटले आहे. त्यांनी उद्योजकांना मानवतावादी सार्वजनिक-खासगीवर भागिदारीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे. (UN Food Programme)

एपीच्या वृत्तानुसार, मास्टरकार्डचे सीईओ मायकेल मिबॅच यांनी म्हटले आहे की, "मानवतावादी मदत हे फार पूर्वीपासून सरकारचे कार्यक्षेत्र आहे" आणि खासगी क्षेत्र आणि विकास संस्थांना पुरवठ्यासाठी आर्थिक देणग्यांचा स्रोत मानला जातो. "पैसा आजही महत्त्वाचा आहे, पण कंपन्या आणखी अधिक काही देऊ शकतात. सार्वजनिक क्षेत्रासोबत भागीदारी करून समोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी खासगी क्षेत्र तयार आहे," असेही ते म्हणाले. "जग अस्वस्थ असताना व्यवसाय कसा काय चालेल" यावरही त्यांनी जोर दिला. (Global hunger crisis)

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news