‘तृणमूल’वर हल्‍लाबोल करत माजी न्‍यायमूर्ती गंगोपाध्‍याय भाजपमध्‍ये दाखल

कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय यांनी अखेर आज भाजपमध्ये प्रवेश केला.
कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय यांनी अखेर आज भाजपमध्ये प्रवेश केला.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय यांनी अखेर आज (दि.७ मार्च) भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्‍यांनी पश्‍चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्‍लाबोल केला. ५ मार्च रोजी गंगोपाध्याय यांनी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला होता. ते आगामी लोकसभा निवडणूक लढवतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ( Former Calcutta High Court Judge Justice Abhijit Gangopadhyay Joins BJP )

भ्रष्ट राज्य सरकारविरोधात लढा देणार

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी न्यायमूर्ती गंगोपाध्‍याय म्‍हणाले की, भ्रष्टाचाराशी लढा द्यावा लागतो हे सर्वांना माहीत आहे. भ्रष्ट राज्य सरकार विरोधात मी लढा देणार आहे. आज मी पूर्णपणे नव्या जगात पाऊल ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या नेत्‍यांकडून मला वेळोवेळी मार्गदर्शन हवे आहे. मला संघाचा शिस्तबद्ध सैनिक म्हणून काम करायचे आहे. पक्षाने साेपवलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. ( Former Calcutta High Court Judge Justice Abhijit Gangopadhyay Joins BJP )

संदेशखाली पीडितांसाठी भाजपचा लढा

पश्‍चिम बंगालमधील बहुचर्चित संदेशखाली प्रकरणावर बोलताना गंगोपाध्‍याय म्‍हणाले की, पश्‍चिम बंगालमधील ही एक अत्‍यंत वाईट घटना आहे. भाजपचे नेते पीडित महिलांच्‍या भेटीसाठी गेले असता त्‍यांना रोखण्‍यात आले. आज भाजप येथील पीडित महिलांसोबत आहे. त्‍यांच्‍यासाठी लढा देत आहे.

कोण आहेत अभिजीत गंगोपाध्याय?

अभिजीत गंगोपाध्‍याय यांनी आपले शालेय शिक्षण 'मित्र इन्स्टिट्यूट' (मेन), कोलकाता येथून पूर्ण केले. त्यांनी कोलकाता विद्यापीठाच्या हाजरा लॉ कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतले. त्याच वेळी ते 'अमित्र चंद्र' बंगाली थिएटरशीही जोडले गेले होते. त्‍यांनी उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात पश्चिम बंगाल प्रशासकीय सेवेतील वर्ग एकचे अधिकारी म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मात्र भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्‍यासाठी त्‍यांनी आपल्‍या नोकरीचा राजीनामा दिला होता. यानंतर त्‍यांनी कोलकाता उच्‍च न्‍यायालयात वकिली सुरु केली. त्‍यांनी दहा वर्ष र्षे वकील म्हणून काम केले. मे 2018 मध्ये, अभिजित गंगोपाध्याय यांना कलकत्ता उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीशपदी नियुक्‍ती झाली. जुलै 2020 मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली होती. यावर्षी ऑगस्टमध्ये ते निवृत्त होणार होते. भ्रष्टाचाराबाबत त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांनी आणि टिप्पण्यांमुळे ते चर्चेत आले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news