Andhra Pradesh Train Collision: आंध्र प्रदेश रेल्वे अपघाताबाबत मोठा खुलासा; ‘पॅसेंजर ट्रेनचे चालक…”

Andhra train collision
Andhra train collision

पुढारी ऑनलाईन डेस्क:  २९ऑक्टोबर २०२३ रोजी आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील कंटकपल्ली येथे रेल्वे अपघात झाला हाेता. या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला तर ५० रेल्वे प्रवासी जखमी झाले होते. रायगडा पॅसेंजर ट्रेनने हावडा-चेन्नई मार्गावर कंटकपल्ली येथे विशाखापट्टणम पलासा ट्रेनला मागून धडक दिली. आता या घटनेबाबत मोठा खुलासा झाला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, "जेव्हा हा अपघात झाला तेव्हा, पॅसेंजर ट्रेनचे चालक आणि सहाय्यक चालक मोबाईलवर क्रिकेट सामना पाहत होते". (Andhra Pradesh Train Collision)

क्रिकेट सामन्यामुळे विचलित झाले…

अश्विनी वैष्णव यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, "आंध्र प्रदेशातील अलीकडे रेल्वे अपघात घटना घडली कारण लोको पायलट आणि सहाय्यक पायलट दोघेही क्रिकेट सामन्यामुळे विचलित झाले होते. या दुर्घटनेनंतर आता आम्ही अशा कोणत्याही घटना शोधून, पायलट आणि सहाय्यक पायलट ट्रेन चालवण्याकडे पूर्ण लक्ष देऊन खात्री करता येईल अशी प्रणाली स्थापित करत आहोत." असे देखील अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे. (Andhra Pradesh Train Collision)

"आम्ही सुरक्षेवर लक्ष केंद्रित करू. प्रत्येक घटनेचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि ती पुन्हा घडू नये म्हणून आम्ही त्यावर उपाय शोधतो." असेही वैष्णव  म्हणाले. (Andhra Pradesh Train Collision)

मात्र, रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) यांनी केलेला तपास अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. मात्र अपघाताच्या एका दिवसानंतर रेल्वेने केलेल्या प्राथमिक तपासात रायगडा पॅसेंजर ट्रेनचा चालक आणि सहाय्यक चालकाला या धडकेसाठी जबाबदार धरण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करून त्यांनी दोन सदोष ऑटो सिग्नल पास केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. या अपघातात दोन्ही क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. (Andhra Pradesh Train Collision)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news