Jharkhand | झारखंडमध्ये स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार, १० जणांनी केले कृत्य | पुढारी

Jharkhand | झारखंडमध्ये स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार, १० जणांनी केले कृत्य

पुढारी ऑनलाईन : झारखंडमधील दुमका जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे शुक्रवारी रात्री उशिरा ४५ वर्षीय स्पॅनिश नागरिक महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. हंसदिहा पोलीस स्थानक क्षेत्रातील कुरुमहाट परिसरात ही घटना घडली. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता तिच्या पतीसोबत बाईकवरून जात होती. यादरम्यान सुमारे ८-१० लोकांनी तिला अडवले आणि तिला एका निर्जनस्थळी नेले, असे पीडितेने म्हटले आहे.

द टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दुमकाचे एसपी पितांबर सिंह खेरवार यांनी म्हटले आहे की त्यांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे. ते पुढे म्हणाले “रात्री १०.३० ते ११ च्या सुमारास सदर पीडित महिलेने मदतीसाठी परिसरात गस्तीवर असलेली पोलिस व्हॅन थांबवली. तिला काही जखमाही झाल्या होत्या. पोलिसांनी तिला रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांना सांगितले की तिच्यावर बलात्कार झाला आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत.”

पीडितेची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

स्पॅनिश जोडप्याबद्दल, ते पुढे म्हणाले की प्रशासनाकडे त्यांच्या दुमका भेटीची अथवा ते ज्या ठिकाणी तंबू ठोकून रहात होते त्याबद्दल कोणतीही माहिती नाही. “हे जोडपे बायकर्स आहेत. ते विविध ठिकाणी फिरत असतात आणि ते प्रवासात वेगवेगळ्या ठिकाणी तंबू घालून राहतात. या प्रकरणी पोलीस अधिक तपशील गोळा करत आहेत.”

हे ही वाचा ;

 

Back to top button