

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : सोशल मीडियामध्ये लग्नसमारंभातील गमतीशीर किस्स्यांबाबत अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आपण पाहतोच. एका लग्नसोहळ्यात भटजीला मंगलाष्टके आणि मंत्रोच्चारासाठी बोलावले होते. या भटजीने मात्र मंगलाष्टका सोडून हिंदी चित्रपटातील गीते सादर करून सर्वांची वाहवा मिळविली.
संबंधित बातम्या
नवरा-नवरीही भटजीच्या गीताने जाम खूश झाली. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, दोन दिवसांत चार लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओमध्ये लग्नमंडपात वधू-वरांसमोर बसून भटजी रोमँटिक गाणी गात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. भटजीच्या अदाकरीवर लग्नातील मंडळींनी काँमेटस् शेअर केल्या आहेत. भटजीचे आम्ही चाहते झालो आहोत, अशी भावनाही अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.