Belgaon Bus Accident : हैदराबादहून बेळगावकडे येणारी खासगी बस उलटली; अनेक प्रवासी गंभीर जखमी | पुढारी

Belgaon Bus Accident : हैदराबादहून बेळगावकडे येणारी खासगी बस उलटली; अनेक प्रवासी गंभीर जखमी

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : हैदराबादहून बेळगावकडे जाणारी खासगी बस कोप्पल जिल्ह्यातील गंगावती तालुक्यातील हेमागुड्डाजवळ उलटली. या अपघातात २० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. २९) सकाळी ७ च्या सुमारास घडली. जखमींना गंगावती आणि कोप्पळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

समोरून आलेल्या बोलेरो गाडीला धडकू नये म्हणून दक्षता घेताना बस उलटली. बसमध्ये ५० हून अधिक प्रवासी होते. यातील अनेक जण गंभीर जखमी झाले असून काहींना उपचारासाठी गंगावती शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button