Rajiv Gandhi Assassination Case : राजीव गांधी हत्येप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या संथनचा मृत्यू | पुढारी

Rajiv Gandhi Assassination Case : राजीव गांधी हत्येप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या संथनचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणातातील आरोपी  श्रीलंकेचा नागरिक असलेल्या एमटी संथन उर्फ ​​टी सुथेनथिराजचे आज (दि.२८) सकाळी आठच्या सुमारास निधन झाले. चेन्नईच्या राजीव गांधी जनरल हॉस्पिटलमध्ये संथनवर उपचार सुरु होते. राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी एमटी संथन उर्फ ​​टी सुथेनथिराजला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. (Rajiv Gandhi Assassination Case) २०२२ मध्ये त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

माहितीनुसार, राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणात निर्दोष सुटका झालेले  श्रीलंकेचे नागरिक असलेला एमटी संथनचे आज (दि.२८)  निधन झाले. दरम्यान गांधी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ६ दोषींना ११ नोव्हेंबर २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने तब्बल ३२ वर्षांनी तुरुंगातून सुटका केली होती. नलिनी, श्रीहरन, संथन, रॉबर्ट पायस, जयकुमार आणि रविचंद्रन अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी  नलिनी आणि रविचंद्रन यांची सुटका करण्यात आली आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी देण्यात आली परंतु उर्वरित चौघांना (श्रीहरन, संथन, रॉबर्ट पायस, जयकुमार) त्रिची मध्यवर्ती कारागृहात विशेष शिबिरात ठेवण्यात आले होते. त्यामध्ये एमटी संथन उर्फ ​​टी सुथेनथिराज याचाही समावेश होता.

हेही वाचा 

Back to top button