Lasya Nandita Passes Away : BRSच्या आमदार लस्या नंदिता यांचे कार अपघातात निधन | पुढारी

Lasya Nandita Passes Away : BRSच्या आमदार लस्या नंदिता यांचे कार अपघातात निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनियंत्रित कार दुभाजकाला धडकल्याने बीआरएस महिला आमदार लस्या नंदिता यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. आमदार त्यांच्याच गाडीतून प्रवास करत होत्या. हा अपघात दरम्यान, संगारेड्डीतील अमीनपूर मंडल परिसरात सुलतानपूर आऊटर रिंग रोड (ओआरआर) येथे झाल्याचे सांगण्यात आले आहे. लस्या नंदिता या सिकंदराबाद कँट मतदारसंघाचे आमदार आहेत. (Lasya Nandita Passes Away)

माहितीनुसार, आमदार लस्या नंदिता या त्यांच्याच गाडीतून प्रवास करत होत्या. दरम्यान संगारेड्डीतील अमीनपूर मंडल परिसरात सुलतानपूर आऊटर रिंग रोडवर त्यांची कार नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकावर आदळली. या अपघातात आमदार लस्या नंदिता यांना गंभीर दुखापत झाली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात  कार चालकही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Lasya Nandita Passes Away : नंदिताच्या निधनाने मला धक्का बसला: मुख्यमंत्री

युवा आमदाराच्या निधनावर शोक व्यक्त करताना तेलंगणाच्या मुख्यमंत्री रेवंती रेड्डी यांनी सोशल मीडियावर लिहिले की, आमदार लस्या नंदिता यांच्या अकाली निधनाने मला खूप धक्का बसला आहे. नंदिताचे वडील. सायनाशी माझे जवळचे नाते होते. मागच्या वर्षी याच महिन्यात त्याचं निधन झालं. त्याच महिन्यात नंदिताचाही अचानक मृत्यू झाला हे खूप दु:खद आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

हेही वाचा 

Back to top button