Chandigarh New mayor | सर्वोच्च न्यायालयाचा भाजपला दणका; 'आप'चे कुलदीप कुमार चंदीगडचे महापौर
पुढारी ऑनलाईन डेस्क: चंदीगड महापौर निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.२० हस्तक्षेप करत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. चंदीगड महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी AAP उमेदवाराला वैधरित्या निवडून आलेला उमेदवार घोषित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे ‘आप’चे कुलदीप कुमार हे आता चंदीगडचे नवीन महापौर असणार आहेत, असे स्पष्ट झाले आहे. (Chandigarh New mayor)
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत चंदीगड प्रशासाने आप आणि काँग्रेसच्या उमेदवाराची अवैध ठरवलेली‘ती’ ८ मते वैध असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. तसेच अवैध ८ मतपत्रिकांमध्ये AAP महापौर उमेदवार कुलदीप कुमार यांच्याच बाजूने मते पडल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान स्पष्ट केले. त्यामुळे ‘आम आदमी पार्टी’चा उमेदवारच चंदीगड महानगरपालिकेचा महापौर असल्याचे न्यायालयाने घोषित केले आहे. (Chandigarh New mayor)
Chandigarh Mayor Election matter | Supreme Court orders that AAP candidate is declared to be the validly elected candidate for the post of Mayor of Chandigarh Municipal Corporation. pic.twitter.com/QMWkJUMij4
— ANI (@ANI) February 20, 2024
AAP candidate for Chandigarh Mayor Election, Kuldeep Kumar celebrates.
Supreme Court ordered that he is declared to be the validly elected candidate for the post of Mayor of Chandigarh Municipal Corporation.
(Pics: AAP PRO) pic.twitter.com/6cn0WENrGR
— ANI (@ANI) February 20, 2024
सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारचा पर्दाफाश- आपचा हल्लाबोल
दिल्लीचे मंत्री, आप नेते सौरभ भारद्वाज या निकालावर म्हणतात, “जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष, भाजप महापौरपदाच्या निवडणुकीत कॅमेऱ्यावर गैरव्यवहार करताना दिसला. ही देशासाठी चिंतेची बाब आहे. मग तिथे पक्ष काय करत असेल? तिथेतर कॅमेरा आणि मायक्रोफोनही नाहीत? त्या सर्व ठिकाणी केंद्र सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल देखील भारद्वाज यांनी केंद्रीय यंत्रणा आणिभाजपवर केला आहे. चंदीगड महापौर निवडणुक प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा पर्दाफाश केला आहे. केंद्र सरकारच्या सर्वोच्च वकिलांनी पीठासीन अधिकाऱ्याची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
#WATCH | Delhi Minister and AAP leader Saurabh Bharadwaj says, “The biggest political party of the world, BJP was seen doing malpractices – on camera – in a mayoral election. This is a matter of concern for the country. What would the party be doing where there is no camera and… https://t.co/bwgQ62Mbvn pic.twitter.com/yeAhV3rQNL
— ANI (@ANI) February 20, 2024
मतपत्रिका, मतमोजणी व्हिडिओचा आधार घेत SC चे निर्देश
चंदीगड महापौर मतदान, मतमोजणी आणि निकालादरम्यान ‘घोडेबाजार’ झाल्याचा आरोप ‘आप’ने केला होता. या निकालाविरोधात ‘आप’ने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर सुनावणीवेळी न्यायालयाने चंदीगड प्रशासनाला फटकारले. त्यानंतर येथील प्रशासनाला मतपत्रिका आणि मतमोजणी दरम्यानचे व्हिडिओ सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने हे पुरावे सादर केले. यानंतर न्यायालयाने आज (दि.२०) पुन्हा सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ‘ती’ ८ मते वैध ठरवत फेरमतमोजणीचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. (Chandigarh New mayoral)
पीठासन अधिकाऱ्यावर कारवाई करा-न्यायालय
चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत मतमोजणी प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करत ‘आप’ने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने महापौर निवडणूक निर्णय अधिकारी अनिल मसिह यांना फटकारले. निवडणुकीतील पीठासन अधिकारी अनिल मसिह निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच मतपत्रिका आणि मतमोजणी दरम्यानचे व्हिडिओ सादर करून यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
हेही वाचा:
- Chandigarh Mayor Election : चंदीगड महापौर निवडणुकीत ‘आप’ला मोठा दिलासा; ‘ती’ ८ मते वैध, फेरमतमोजणीचे SC चे निर्देश
- चंदीगड महापौर निवडणूक : पीठासीन अधिकार्यावर कारवाई करावी : सर्वोच्च न्यायालय
- सुप्रीम कोर्टातील सुनावणीपूर्वी भाजपने सोडले चंदीगड महापौरपद!
- Chandigarh mayor election : भाजप विरुद्ध ‘इंडिया’ आघाडीचा पहिला सामना लांबणीवर! चंदीगड महापौर निवडणुकीसाठी मतदान नाहीच