Chandigarh mayor election : भाजप विरुद्ध ‘इंडिया’ आघाडीचा पहिला सामना लांबणीवर! चंदीगड महापौर निवडणुकीसाठी मतदान नाहीच

चंदीगड महापालिका कार्यालयाबाहेर आप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी  निदर्शने केली.
चंदीगड महापालिका कार्यालयाबाहेर आप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी  निदर्शने केली.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भाजप विरुद्ध 'इंडिया' आघाडीचा पहिला सामना, असे ओळख झालेली चंदीगड महापौर पदाच्‍या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र निवडणूक अधिकार्‍यांची प्रकृती बिघडल्‍याने आज (दि.१८) होणारी मतदान प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. आता पुढील सूचना मिळेपर्यंत ही निवडणूक लांबणीवर पडली आहे. दरम्‍यान, मतदान लांबणीवर पडल्‍याच्‍या निषेधार्थ आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्‍या नगरसेवकांनी महापालिका कार्यालयाबाहेर निदर्शने केली. (Chandigarh mayor election) पराभव दिसत असल्‍याने भाजपने जाणीवपूर्वक मतदान हाेवू दिले नाही, असा आराेपही त्‍यांनी केला आहे. 'आप;ने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे चंदीगड महापौर निवडणुकीत भाजप विरुद्ध एकत्र आले आहेत. , आम आदमी पार्टी (आप) महापौरपदासाठी तर काँग्रेस वरिष्ठ उपमहापौर आणि उपमहापौरपदासाठी लढणार आहे. ३५ नगरसेवकांची संख्‍या असणार्‍या चंदीगड महानगरपालिकेत भाजपचे १४ तर आम आदमी पार्टीचे १३ आणि काँग्रेसचे ७ नगरसेवक आहेत. तर शिरोमणी अकाली दलाचा एक नगरसेवक आहे. (Chandigarh mayor election)

Chandigarh mayor election : आप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांची निदर्शने

चंदीगड महापौरपदासाठी आज मतदान होणार होते. मतदान प्रक्रिया सुरळीत होण्‍यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलासह चंदीगड पोलिसांचे 600 कर्मचारी सेक्टर-17 येथील महापालिका कार्यालयात तैनात करण्यात आले आहेत. दरम्‍यान नामनिर्देशित पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांची प्रकृती बिघडल्‍याचा संदेश प्रसारित झाल्यानंतर महापालिका कार्यालयाबाहेर आप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी  निदर्शने सुरू केली. या  निवडणुकात पराभव दिसत असल्‍यानेच भाजपने मतदान हाेवू दिले नाही, असा आरोप त्‍यांनी केला आहे.

चंदीगडमध्‍ये 'ऑपरेशन लोटस' फसले : काँग्रेस

चंदीगडच्या महापौरपदाची निवडणूक 2024: "चंदीगडमध्ये 'ऑपरेशन लोटस' अयशस्वी झाले आहे. भाजपला पराभव स्‍पष्‍टपणे दिसत होता त्‍यामुळेच त्‍यांच्‍या पक्षाचे नगरसेवक मतदानाला आले नाहीत. भाजपचा हा नैतिकदृष्ट्या पराभव आहे. आम आदमी पार्टी आणि काँग्रेस एकत्र आहे. भाजप आपला पराभव स्वीकारू शकत नाही, असे चंडीगड काँग्रेसच्‍या प्रदेशाध्‍यक्ष हरमोहिंदर सिंग लकी यांनी म्‍हटले आहे.

आम आदमी पार्टीची उच्‍च न्‍यायालयात धाव

आम आदमी पक्षाने पुन्हा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात आणि आजच दुसरा पीठासीन अधिकारी नियुक्त करावा, ज्याने निवडणुकीची कार्यवाही पूर्ण करावी. दरम्‍यान, निवडणूक पुढे ढकलल्याची माहिती मिळताच आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा महापालिकेत पोहोचले आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news