Stock Market Closing Bell | तेजीचा षटकार! सेन्सेक्स ३४९ अंकांनी वाढून बंद, ‘निफ्टी’चा नवा उच्चांक

Stock Market Closing Bell | तेजीचा षटकार! सेन्सेक्स ३४९ अंकांनी वाढून बंद, ‘निफ्टी’चा नवा उच्चांक

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारात मंगळवारी सलग सहाव्या सत्रांत तेजी कायम राहिली. सेन्सेक्स ३४९ अंकांनी वाढून ७३,०५७ वर बंद झाला. तर निफ्टीने आजच्या ट्रेडिंग सत्रात २२,२१५ वर झेप घेत नवा उच्चांक नोंदवला. त्यानंतर निफ्टी ७४ अंकांच्या वाढीसह २२,१९६ वर स्थिरावला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात किरकोळ घसरण झाली. विशेषतः बाजारात आज बँकिग शेअर्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला. (Stock Market Closing Bell)

दरम्यान, क्षेत्रीय आघाडीवर, बँक, मीडिया, पॉवर आणि रियल्टी प्रत्येकी १-३ टक्क्यांनी वाढले. तर ऑटो, आयटी, मेटल प्रत्येकी १ टक्क्यांनी घसरले.

जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांचा भारतीय शेअर बाजारात सुरुवातीला काही प्रमाणात परिणाम दिसून आला होता. पण नंतर सेन्सेक्स आणि निफ्टीने रिकव्हरी करत उच्चांकी पातळीवर व्यवहार केला.

शेअर बाजाराची आज सुस्त सुरुवात झाली होती. पण बँकिंग मीडिया स्टॉक्समधील तेजीच्या जोरावर निफ्टी आणि सेन्सेक्सने सुरुवातीचा तोटा पुसून टाकला. निफ्टीने ट्रेडिंग सत्राच्या शेवटच्या टप्प्यात २२,२०० चा सार्वकालिक उच्चांक गाठला.

सेन्सेक्स आज ७२,७२७ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७३,१०० वर गेला. सेन्सेक्सवर पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, एनटीपीसी, कोटक बँक, इंडसइंड बँक, नेस्ले इंडिया हे टॉप गेनर्स राहिले. तर टीसीएस, बजाजा फिनसर्व्ह, टाटा मोटर्स, एचसीएल टेक, आयटीसी या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

निफ्टी आज २२,०९९ वर खुला झाला होता. त्यानंतर त्याने २२,२१२ पर्यंत वाढत नवे शिखर गाठले. निफ्टीवर पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, एनटीपीसी, कोटक बँक १ ते ४ टक्क्यांदरम्यान वाढले. तर हिरो मोटोरकॉर्प, कोल इंडिया, आयशर मोटर्स, टीसीएस हे घसरले. (Stock Market Closing Bell)

निफ्टी बँक तेजीत

एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या नेतृत्वाखाली बँक निफ्टी निर्देशांकाने १ टक्क्यांहून अधिक वाढून ४७,१०० चा टप्पा ओलांडला.

१,९५५ शेअर्समध्ये तेजी

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सवर आज विक्रीचा दबाव राहिला. बीएसई सेन्सेक्सवर वधारुन बंद झालेल्या शेअर्सची संख्या अधिक आहे. बीएसईवर एकूण ३,९३१ शेअर्समध्ये व्यवहार दिसून आला. यातील १,९५५ शेअर्स वाढून बंद झाले. तर १,८७७ शेअर्समध्ये घसरण झाली. तर ९९ शेअर्समध्ये कोणताही चढ-उतार दिसून आला नाही. याशिवाय ३३८ शेअर्सनी आजच्या ट्रेडिंग सत्रात त्यांचा ५२ आठवड्यांच्या उच्चांकाला स्पर्श केला.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news