पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तर प्रदेशातील हिंदू तीर्थक्षेत्र कल्की धाम मंदिराची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि.१९) पायाभरणी करण्यात आली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि श्री कल्की धाम निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष आचार्य प्रमोद कृष्णम हे देखील उपस्थित होते. (PM Modi Kalki Dham)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उ. प्रदेशातील संभलमधील हिंदू मंदिर कल्की धामच्या पायाभरणी समारंभात पूजा केली. अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीनंतर या मंदिराची सर्वाधिक चर्चा झाली होती. आचार्य प्रमोद कृष्णम हे श्री कल्की धाम कन्स्ट्रक्शन ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या निमंत्रणावर पंतप्रधान मोदी या मंदिराच्या पायाभरणीला उपस्थित आहेत. (PM Modi Kalki Dham)
"आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीदेखील आहे, त्यामुळे हा दिवस अधिक पवित्र आणि प्रेरणादायी बनला आहे… या निमित्ताने मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन करतो…", असे पंतप्रधान मोदी यांनी संभल येथील कल्की धाम या हिंदू मंदिराच्या पायाभरणी समारंभात बोलताना म्हटले.
PM Modi Kalki Dham: उ. प्रदेशातील कल्की मंदिर : जगातील अद्वितीय मंदिर
कल्की मंदिर हे विष्णूचा 10वा आणि शेवटचा अवतार असलेल्या कल्किला समर्पित आहे. कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णू कल्किच्या रूपात प्रकट होतील, असे सनातन धर्मात मानले जाते. या बाबतीत, हे मंदिर जगात अद्वितीय आहे कारण मंदिर ज्याच्यासाठी बांधले जात आहे त्याचा अवतार अद्याप प्रकट झालेला नाही.
या मंदिरात 10 गर्भगृहे असतील, या दहा गर्भगृहांमध्ये दहा वेगवेगळ्या अवतारांची स्थापना केली जाईल. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अयोध्येतील राम मंदिर आणि सोमनाथ मंदिरात वापरण्यात आलेल्या गुलाबी दगडाने हे मंदिर बांधले जात आहे. या मंदिरातही स्टील किंवा लोखंडाचा वापर केला जाणार नाही. हे मंदिर ५ एकरावर बांधले जाणार आहे. बांधण्यासाठी ५ वर्षे लागतील.
हेही वाचा: