Delhi trust vote : केजरीवाल सरकारनं विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं जिंकला | पुढारी

Delhi trust vote : केजरीवाल सरकारनं विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं जिंकला

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. ६२ पैकी ५४ आपचे आमदार मतदानावेळी उपस्थित होते. गेल्या तीन वर्षांत केजरीवाल सरकारचा हा तिसरा विश्वासदर्शक ठराव होता. “भाजपने आपचे सरकार पाडण्यासाठी आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला. भाजपने या वर्षीची लोकसभा निवडणूक जिंकली तरी आम आदमी पक्ष २०२९ च्या निवडणुकीत देशाला भाजपमुक्त करेल,” असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. (Delhi trust vote)

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेत भाग घेतला. ते आपल्या भाषणात म्हणाले, ‘या सभागृहात आमचे बहुमत आहे. आमच्या दोन आमदारांना भाजपच्या लोकांनी संपर्क केला होता. भाजप आमच्या आमदारांना पैसे देऊन आणि दिल्लीतील सरकार पाडून पक्ष फोडू इच्छित होता, असा आरोप त्यांनी केला. ईडीच्या समन्सवर केजरीवाल म्हणाले की, भाजपला मला अटक करायची आहे. तुम्ही केजरीवालला अटक कराल, पण केजरीवालांच्या विचारसरणीला अटक कशी करणार? संपूर्ण देश पाहत आहे. आता लोक प्रश्न विचारत आहेत की पंतप्रधान मोदींना केजरीवालला संपवायचे आहे का? आज भाजपचे सर्वात मोठे आव्हान आम आदमी पार्टी आहे. २०२४ मध्ये भाजपचा पराभव झाला नाही तर २०२९ मध्ये आम आदमी पार्टी देशाला भाजपपासून मुक्त करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Delhi trust vote)

हेही वाचा : 

Back to top button