Sonia Gandhi : माझं ‘सासर’ हेच माझं ‘सौभाग्य’, खासदार सोनिया गांधींची ‘रायबरेलीकरांना’ भावनिक साद | पुढारी

Sonia Gandhi : माझं 'सासर' हेच माझं 'सौभाग्य', खासदार सोनिया गांधींची 'रायबरेलीकरांना' भावनिक साद

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि रायबरेली लोकसभा खासदार सोनिया गांधी आता तब्येतीच्या कारणास्तव लोकसभा लढवणार नाहीत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्यांनी राजस्थानमधून राज्यसभेवर जाण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता त्या लोकनियुक्त खासदार नसून, त्या राज्यसभेच्या खासदार असणार आहेत. या प्रसंगी त्यांनी त्यांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीमधील जनतेला ‘माझं सासर, हेच माझं सौभाग्य’ असे म्हणत भावनिक साद घातली आहे. (Sonia Gandhi)

Sonia Gandhi : रायबरेली…मला हे सासरकडून मिळालेलं सौभाग्य

खासदार सोनिया गांधी यांचे वाढते वय आणि तब्येतीचा हवाला देत त्यांनी रायबरेलीमधून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सोनिया गांधींसाठी किती कठीण होता, हे त्यांनी रायबरेलीच्या जनतेला लिहिलेल्या भावनिक पत्रात नमूद केले आहे. खासदार गांधी यांनी रायबरेलीच्या जनतेला लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘माझं दिल्लीतील कुटुंब अपूर्ण आहे, ते तुम्हा लोकांना भेटून पूर्ण होते. हा स्नेह आणि हे नातं खूप जुने आहे. रायबरेली आणि येथील जनता माझ्या सासरच्या सौभाग्यासारखं मला मिळालेलं आहे’ अशी भावनिक साद त्यांनी रायबरेलीतील जनतेला घातली आहे. (Sonia Gandhi)

Sonia Gandhi: रायबरेलीच्या जनतेने मला पाठींबा दिला

सोनिया गांधी यांनी पुढे लिहिले आहे की, “माझ्या सासरच्या मंडळींकडून मला रायबरेली मिळाली हे माझं सौभाग्य आहे. पती राजीव गांधी आणि सासू इंदिरा गांधी यांना गमावल्यानंतर जेव्हा त्या रायबरेलीला आल्या तेव्हा इथल्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिल्याचे देखील सोनिया गांधी यांनी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे. (Sonia Gandhi)

आज मी जी काही आहे ते तुमच्यामुळेच

गेल्या दोन निवडणुकांमध्ये कठीण परिस्थितीतही तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात हे मी कधीही विसरू शकत नाही. आज मी जी काही आहे ती तुमच्यामुळेच आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो. मी प्रत्येक टप्प्यावर तुमचा हा विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न केला आहे. (Sonia Gandhi)

‘माझ्यासारखीच माझ्या कुटुंबाचीही काळजी घ्या’

काँग्रेस नेत्याने रायबरेलीच्या लोकांना सांगितले आहे की, वाढत्या वयामुळे आणि आरोग्याशी संबंधित कारणांमुळे त्या यापुढे लोकसभा निवडणूक लढवू शकणार नाहीत. आता त्यांना थेट येथील जनतेची सेवा करण्याची संधी मिळणार नाही. पण त्यांचे हृदय आणि आत्मा नेहमीच येथेच राहील. या सोबतच योनिया गांधी यांनी रायबरेलीच्या लोकांवर विश्वास व्यक्त केला आणि सांगितले की, त्यांनी आजवर ज्याप्रकारे त्यांची काळजी घेतली आहे. त्याच पद्धतीने त्यांनी त्यांच्या कुटुंबाची देखील काळजी घ्यावी. यासोबतच त्यांनी लवकरच रायबरेलीच्या जनतेला भेटण्याचे आश्वासनही दिले आहे.

हेही वाचा:

Back to top button