चोरी केलेल्या मोटरसायकलने १०० हून अधिक मोबाईलची चोरी करणाऱ्या या सराईत गुन्हेगारास दिल्लीतील शाहदरा येथील पोलिसांनी अटक केली. चौकशी दरम्यान या महाभाग चोराने १०० हून अधिक मोबाईल चोरले तसेच इतरही लूटमाऱ्या केल्याचे त्याने कबूल केले. या सर्व गुन्ह्यात मोबाईल चोर चोरीच्याच मोटारसायकलचा वापर करत होता.
पोलिसांना या चोराकडून एक चोरीची मोटारसायक आणि चोरलेले दोन मोबाईल आढळले. याशिवाय त्याने चोरलेले अनेक साहित्य त्याच्याकडून मिळविण्यात यश आले आहे. दिल्ली आणि गाजियाबादच्या सीमेवर त्याने या चोऱ्या केलेल्या आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली पोलिसांकडे तक्रार येत होती. की, लाल रंगाच्या मोटरसायकलवरुन एक युवक लोकांचे मोबाईल चोरत आहे. तसेच दागिणे देखिल हिसडा मारुन पळवतो आहे. अशा अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त होत होत्या. एकाच प्रकारच्या वाढत्या घटना पाहून दिल्ली पोलिसांनी तमाम पोलिस ठाण्यांना सावध केले होते.
यानंतर २२ नोव्हेंबरला सीमापुरी पोलीस ठाण्याला सुचना मिळाली संबधित दुचाकीस्वार तरुण त्या भागामध्ये फिरत आहे. तेव्हा पोलिसांनी ट्रॅप लावून त्या चोरास पकडले. आदिल मलिक नावाचा या २७ वर्षांचा आरोपीने अनेक महिन्यांपासून लूटमाऱ्या करत असल्याचे चौकशी दरम्यान कबूल केले.
बायको आणि दोन गर्लफेंडच्या हौस पुरवण्यासाठी बनला चोर
आदील हा अनेक महिन्यांपासून चोऱ्या करत आहे. चोरी केलेल्या मोटारसायकलवरुनच तो हे कृत्य करत होता. चौकशी दरम्यान आरोपीने सांगितलेल्या कारणामुळे सारे पोलिस देखिल आश्चर्यचकीत झाले. आदीलने सांगितले की तो विवाहित आहे. शिवाय त्याला दोन गर्लफ्रेंड आहेत. एक गर्लफ्रेंड एका नामांकित रुग्णालयात डॉक्टर आहे. तर दुसरी नर्स आहे.
बायकोसह दोन्ही गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी हा वारंवार महागड्या हॉटेलमध्ये आणि मॉलमध्ये घेऊन जातो. या तिघींची हौस भागवण्यासाठी तो पाण्यासारखा पैसा खर्च करतो. त्यामुळे त्याला दरवेळी अधिक पैशाची गरज भासत होती. म्हणून या बहाद्दराने महिन्याकाठी ३० – ४० मोबाईल चोरण्याचा सपाटा लावला होता. तो प्रत्येक मोबाईल ३ ते ६ हजार रुपयांना तो विकत होता. जेणे करुन तो महिन्याला लाखभर रुपयांची जुळणी करत होता. यातून तो पत्नीसह २ गर्लफेंडचा खर्च सांभाळत होता.
आता पोलिस या चोराने कोणाकोणाचे मोबाईल चोरले आहेत याचा शोध घेत आहेत. तसेच हा चोर ज्या दुकानदाराला चोरीचा मोबाईल विकत होता त्याचा देखिल शोध घेत आहेत.