शंभू-जिंद सीमेवर पोलीस-शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री; आंदोलकांवर अश्रुधुराचे गोळे

शंभू-जिंद सीमेवर पोलीस-शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री; आंदोलकांवर अश्रुधुराचे गोळे

पुढारी ऑनलाई डेस्क : पटियालामधील शंभू आणि जिंदमधील दातासिंगवाला सीलबंद सीमेवर आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच रबर गोळ्या आणि पाण्याच्या तोफांचा मारा केला.

एमएसपी हमी कायदा आणि कर्जमाफीसह १२ मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या पंजाबमधील शेतकऱ्यांनी सरकारशी चर्चा निष्फळ ठरल्यानंतर मंगळवारी सकाळी दिल्लीकडे मोर्चा वळवला. पंजाबच्या विविध भागातून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये तंबू आणि रेशन घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना हरियाणाच्या सीमेवर थांबवण्यात आले आहे. सीमेवर झालेल्या चकमकीत नारायणगड, अंबाला येथील डीएसपी आदर्शदीप यांच्यासह जवळपास १०० शेतकरी आणि २७ पोलीस आणि निमलष्करी दलाचे कर्मचारी जखमी झाले आहेत. पंजाब-हरियाणा सीमेवरील १४ पैकी तीन प्रवेशदारांवर सुमारे २० हजार शेतकरी जमले आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news