Kota News: कोटामध्ये आणखी एका विद्यार्थ्याने जीवन संपवले; वर्षातील चौथी घटना

Kota News
Kota News

पुढारी ऑनलाईन डेस्क: राजस्थानमधील कोटा येथे आज  (दि.१३) सकाळी आणखी एका विद्यार्थ्याने जीवन संपवले. या वर्षात कोटामधील ही  चौथी घटना ठरली आहे. कोटा येथे जेईई, आयआयटी प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी येणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये दिवसेंदिवस जीवन संपवण्याच्या घटना वाढत आहेत. यापूर्वी गेल्या महिन्यात ३० जानेवारीला एका विद्यार्थ्याने  आपले जीवन संपवले होते. (Kota News)

Kota News: JEE-Mains परिक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण, उचलले टोकाचे पाऊल

कोटा येथे आज सकाळी जीवन संपवलेल्या विद्यार्थ्याचे नाव शुभ चौधरी (वय १६ वर्षे) असे आहे. तो मूळचा झारखंडचा रहिवासी आहे. आयआयटीसह देशातील उच्च अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या JEE-Mains परीक्षेची तो तयारी करत होता. गेल्या दोन वर्षांपासून तो कोटा येथे राहत होता. जेईई मेन्सचा निकाल जाहीर झाला तेव्हा शुभला त्याचे गुण अपेक्षेपेक्षा कमी पडल्याचे कळले. यानंतर तो त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत परतला. कुटुंबीयांना विद्यार्थ्याचा सकाळचा फोन आला नाही, तेव्हा त्यांनी वॉर्डनशी संपर्क साधला, तेव्हा समजले की विद्यार्थ्याने जीवन संपवले आहे. दरम्यान, त्याचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. (Kota News)

कुटुंबीय कोटात पोहचल्यानंतरच शवविच्छेदन

पोलिसांकडून तपास सुरू असून, ते सुसाईड नोट किंवा इतर कोणता सुगावा मिळेल का? याचा त्याच्या खोलीचा शोध घेत आहेत. या घटनेची तरुणाच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली असून, ते कोटा येथे पोहोचल्यानंतर शवविच्छेदन केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (Kota News)

'मम्मी, पप्पा…मला JEE शक्य नाही' म्हणत युवतीने संपवले होतेजीवन

'मम्मी, पप्पा…मला JEE शक्य नाही, मी करू शकत नाही, असे पत्र लिहित एका युवतीन जीवन संपवल्‍याची हृदयद्रावक घटना कोटा येथे मागील महिन्यात ३० जानेवारीला घडली होती. यापूर्वी देखील मंगळवार २३ जानेवारीला खासगी कोचिंगद्वारे NEET ची तयारी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका विद्यार्थ्याने आपले जीवन संपवले होते.

स्वप्न उराशी बाळगून देशभरातले हजारो विद्यार्थी कोटात

कोटा हे भारतातील अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांच्या तयारीचे केंद्र आहे आणि दरवर्षी हजारो इच्छुक या स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या आशेने शहरात येतात. राज्स्थानातील कोटा येथे सुमारे दोनशेहून अधिक खासगी शिकवणी वर्ग इथे आहेत. देशातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगून देशभरातले हजारो विद्यार्थी येथे येतात.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news