Ashok Chavan Resign:’आगे आगे देखो होता है क्या?’: अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाचे फडणवीसांचे संकेत | पुढारी

Ashok Chavan Resign:'आगे आगे देखो होता है क्या?': अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाचे फडणवीसांचे संकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. चव्हाण नॉट रिचेबल झाले असून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता हे मला तुमच्याकडून समजत आहे, असे सांगून आगे आगे देखो होता है क्या ? असे चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले. Ashok Chavan Resign

फडणवीस म्हणाले की, इतर पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. विशेषत: काँग्रेसचे अनेक नेते वरिष्ठ नेत्यांच्या वागणुकीमुळे आमच्या संपर्कात आहेत. त्यांना त्यांच्या पक्षात गुदमरल्यासारखे वाटत आहे. कोण आमच्या संपर्कात आहोत ते लवकरच उघड होईल. ‘आगे आगे देखिए होता है क्या’, असे सुचक संकेत फडणवीस यांनी दिले. Ashok Chavan Resign

दरम्यान, चव्हाण यांनी कोणत्या कारणावरून राजीनामा दिला आहे, हे पाहावे लागले. असे अनेक नेते पुढील काळात पक्ष प्रवेश करतील असे राज्यात वातावरण आहे. काँग्रेस पक्षात धुसफूस आहेत. त्यामुळे अनेक नेते भाजपच्या संपर्कात आहेत. चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार का ? याबाबत ते म्हणाले की, माझ्याकडे याबाबत कोणतीही माहिती आलेली नाही. परंतु भाजपचा दुपटा, विचार ज्यांना मान्य आहे, त्यांच्यासाठी आमच्या पक्षाची दारे खुली आहेत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा 

Back to top button