पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी यांच्या बाबत एकच वक्तव्य करुन मोठे राजकीय संकेत दिले. त्यांनी तृणमूल काँग्रेस आपला विस्तार करण्याचा कार्यक्रम सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले. त्या आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदार संघ वाराणसी आणि मुंबईचा दौरा देखील करणार आहे.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस त्यांच्या योजनांवर अधिकार गाजवू शकतात असे संकेत दिले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीबाबत बोलाताना सांगितले की त्यांच्यासोबतची बैठक अजून ठरलेली नाही कारण त्या पंजाबमधील निवडणुकांमध्ये गुंतल्या आहेत. मात्र त्यांनी काही वेळानंतर आम्ही सारखं सारखं सोनिया गांधी यांना का भेटायचे? असा सवालही केला.
बॅनर्जी म्हणाल्या, 'यावेळी मी भेटीसाठी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ घेतली होती. सगळे नेते पंजाब निवडणुकीत गुंतले आहेत. काम सर्वप्रथम प्रत्येक वेळी आम्ही सोनिया गांधी यांना का भेटायचे? हे संविधानानुसार सक्तीचे आहे का?'
ममता बॅनर्जी यांचे हे वक्तव्य तृणमूल काँग्रेसने मोठ्या प्रमाणावर इतर पक्षातून सुरु केलेल्या इनकमिंगच्या पार्श्वभूमीवर आले आहे. यात मोठ्या संख्येने काँग्रेसमधील आमदार आणि नेत्यांचा समावेश आहे. नुकतेच मेघालय मधील १२ आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये सामिल झाले आहेत. याचबरोबर गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईजिन्हो फ्लेरियो, दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सुपूत्र अभिजीत मुखर्जी यांनी देखील तृणमूल काँग्रेसचा झेंडा हातात घेतला आहे.
यापूर्वी ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी यांच्यातील ट्युनिंग चांगले असल्याचे दिसून आले आहे. मात्र पुढच्या पिढीत हे ट्युनिंग अजून पर्यंत दिसून आलेले नाही. बंगालमधील काँग्रेस नेते आणि बॅनर्जी यांच्यातील नाते फारसचे चांगले नाही. त्यामुळे काँग्रेस आणि तृणमूल यांच्यातील दरी अधिक वाढत आहे.
पश्चिम बंगालमध्ये एप्रिल – मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यानंतर २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी भाजप विरोधी आघाडीचे नेतृत्व करु शकतात अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी येणाऱ्या उत्तर प्रदेश निवडणुकीत अखिलेश यादव यांना सहकार्य करण्यास तयार असल्याचेही वक्तव्य केले होते.
हेही वाचा :