TMC : मेघालयमध्‍ये काॅंग्रेसला भगदाड ! १२ आमदारांनी केला तृणमूलमध्ये प्रवेश | पुढारी

TMC : मेघालयमध्‍ये काॅंग्रेसला भगदाड ! १२ आमदारांनी केला तृणमूलमध्ये प्रवेश

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन

मेघालय राज्याचे माजी मुख्यमंत्री मुकूल संगमा आणि राज्यातील काॅंग्रेसचे १७ आमदारांपैकी १२ आमदार तृणमूल काॅंग्रेस (TMC) मध्ये प्रवेश केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या आमदारांनी पहिल्यांदा विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिले होते.

मागील काही महिन्यांपासून राज्यात तृणमूल काॅंग्रेस पक्षाचा विस्तार करण्यावर भर दिला जात आहे. मेघालयमध्ये तृणमूल काॅंग्रेसच्या विस्तारात काॅंग्रसेच्या नेत्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्रिपूरा आणि गोवा या राज्यांमध्ये तृणमूल काँग्रेसने ( TMC) आपला विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे.

मंगळवारी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काॅंग्रेस पक्षाने तीन महत्वाची उद्दिष्टे पार पाडली. त्यात टीएमसीने पंजाब आणि हरियाणात आपला जम बसविण्यास यशस्वी झाली आहे. माजी क्रिकेटपटू कीर्ती आजाद, जनता दल (युनायटेड) चे माजी राज्यसभा सदस्य पवन शर्मा आणि हरियाणा प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष अशोक तंवर हेदेखील टीएमसीमध्ये प्रवेश केला हाेता.

काॅंग्रेस पक्षाची पार्श्वभूमी असणारे अनेक नेते मागील काही महिन्यांपासून तृणमूल काॅंग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. यामध्ये सुष्मिता देव, लुईजिन्हो फालेरियो आणि अभिजीत मुखर्जी यांनीदेखील टीएमसी पक्षात प्रवेश केला आहे. मेघालयमधील १२ आमदारांनी आणि काही महत्वाच्या नेत्यांनी काॅंग्रेसमधून टीएमसीमध्ये प्रवेश केल्यामुळे काॅंग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, अशी चर्चा राष्ट्रीय राजकारणाच्या वर्तुळात रंगत आहे.

पाहा व्हिडीओ : कोल्हापूरचा अंध पैलवान गाजवतोय मोठ-मोठी मैदानं

Back to top button